नवी दिल्लीः पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या लाँग मार्चमध्ये व्यस्त आहेत. त्यांच् या मोर्चामध्येही मोठी गर्दी दिसून येत आहे. पाकिस्तानातील लाँग मार्चचा असाच एक व्हिडिओ इम्रान खान यांनी शेअर केला आहे. आणि लिहिले की, ही ती क्रांती आहे ज्याबद्दल मी बोलत होतो. मात्र या रॅलीचे कव्हरेज करण्यासाठी आलेल्या एका पत्रकाराचा यामध्ये मृत्यू झाला आहे. इम्रान खान यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे.
त्याच रॅलीचे वृत्तांकन करण्यासाठी महिला पत्रकार आली होती. मात्र वृत्तांकन करत असताना एक अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
इम्रान खान यांच्या लाँग मार्चमध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियावरुन या घटनेबद्दल दुःख व्यक्त करण्यात येत आहे. कारण माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी जो लाँग मार्च काढला होता, त्याच लाँग मार्चमध्ये असलेल्या कंटेनर एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू झाला आहे.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिला पत्रकाराचे नाव सद्दफ असून ती कंटेनरमध्ये चढत असतानाच तिचा तोल जाऊन ती खाली पडल्याने चाकाखाली चिरडून तिचा मृत्यू झाला.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही पत्रकाराच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, लाँग मार्चमध्ये कंटेनरमधून पडून पत्रकार सदफ नईमच्या मृत्यूमुळे आपल्याला खूप दुःख झाले आहे.
या दु:खद घटने आपण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.सदाफ नईम एक गतिमान आणि मेहनती पत्रकार होती असंही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान ‘हकीकी आझादी मार्च’ काढत आहेत. शनिवारी इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू होईपर्यंत हा मार्च असणार आहे.
इम्रान खान यांच्या लाँग मार्चबाबत सरकारच्यावतीने गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांच्या नेतृत्वाखाली एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. लॉंग मार्च इस्लामाबादला पोहोचल्यावर ही समिती पीटीआय नेतृत्वाबरोबर चर्चा करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना मोठा झटका बसला होता. खरं तर, पाकिस्तानमधील इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने टीव्ही चॅनेलला इम्रान खानच्या आझादी मार्चचे लाईव्ह कव्हरेज करण्यापासून रोखले होते. या आदेशानुसार इम्रान खान यांच्या आझादी मार्चचे थेट प्रक्षेपण केले जात नसल्याचे सांगण्यात आले आहे.