नवी दिल्ली : कर्जबाजारी पाकिस्तानने भारताकडून कापूस आणि साखर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. पण अवघ्या 24 तासांत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पलटी मारल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तान फेडरल कॅबिनेटने इकॉनॉमिक को-ऑर्डिनेशन कमिटीने तो प्रस्ताव नाकारला आहे. या प्रस्तावात भारताकडून कॉटन आणि साखर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ECC ही एक फेडरल इन्स्टिट्यूशन आहे जे आर्थिक बाबींमध्ये पंतप्रधानांना सल्ला देते. (Pakistan cancels Proposal to buy cotton and sugar from India)
पाकिस्तानच्या Geo news ने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेटने हा प्रस्ताव गुरुवारी नाकारला आहे. पाकिस्तानचे मानव अधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी ट्वीटरवरुन ही माहिती दिली आहे. पाकिस्तान मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतासोबत पुन्हा एकदा व्यापार सुरु करण्याबाबत नकार देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. भारतासोबत तोपर्यंत संबंध ठिक होऊ शकत नाहीत, जोपर्यंत भारत जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा बहाल करत नाही, असं इम्रान खान यांनी सांगितल्याचंही त्यांनी म्हटलंय.
And today Cabinet stated clearly NO trade with India. PM made clear there can be no normalisation of relations with India until they reverse their illegal actions viz IIOJK of 5 Aug 2019. https://t.co/HDWt3kBM3c
— Shireen Mazari (@ShireenMazari1) April 1, 2021
सध्या पाकिस्तान आकंठ कर्जात बुडाला आहे, मात्र त्यातही पाकिस्तानकडून कर्ज घेण्याचं काम सुरुच आहे. आता पाकिस्तान बालाकोटमध्ये उधारीवर पैसे घेऊन एक महत्त्वकांक्षी प्रकल्प उभा करणार आहे. बालाकोटमध्ये 300 मेगावॅट क्षमतेचा हायड्रोपावर प्लँट उभा करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. यासाठी आशियाई विकास बँकेने (ADB) पाकिस्तानला 300 मिलियन डॉलर (जवळपास 2195 कोटी रुपये) कर्ज मंजूर केलंय. ADB ने मंगळवारी (30 मार्च) याबाबत घोषणा केलीय.
भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर बालाकोट हे नाव जगभरात चर्चेत आलं. भारताने या ठिकाणी कारवाई करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. 2019 मध्ये भारतातील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने ही कारवाई केली होती. आशियाई विकास बँकेने म्हटलंय, “‘द एशियन डेव्हलपमेंट बँकेने (ADB) 300 मेगावॅट क्षमतेच्या हायड्रोपावर प्लँटच्या निर्मितीसाठी 300 मिलियन डॉलरचं कर्ज मंजूर केलं होतं. या अंतर्गत प्रदुषण विरहित उर्जानिर्मितीसाठी पाकिस्तानला मदत मिळेल.”
संबंधित बातम्या :
Report on Nuclear Bomb : पाकिस्तानकडे भारतापेक्षाही जास्त अणुबॉम्ब, कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्र?
Pakistan cancels Proposal to buy cotton and sugar from India