छोटीशी आग नंतर शक्तिशाली बॉम्बस्फोट, तब्बल 1100 जणांचा मृत्यू

| Updated on: Jan 27, 2021 | 10:48 AM

नाजयेरियामध्ये 2002 साली आजच्याच दिवशी ( 27 जानेवारी) अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली होती. (Nigeria lagos armoury explosion)

छोटीशी आग नंतर शक्तिशाली बॉम्बस्फोट, तब्बल 1100 जणांचा मृत्यू
Follow us on

नवी दिल्ली : इतिहासात अशा काही गोष्टी घडून गेलेल्या असतात, ज्यांना विसरणं कधीच शक्य नसतं. नाजयेरियामध्ये 2002 साली आजच्याच दिवशी ( 27 जानेवारी) अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली होती. नायजेरियामधील लागोस शहरात छोट्याशा आगीमुळे तब्बल 1100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल 20 हजार नागरिकांना विस्थापित व्हावं लागलं होतं. (in Nigeria lagos armoury explosion 27 january 2002, 1100 people died)

नेमकी घटना काय ?

नायजेरीया देशातील लागोस शहरात 27 जानेवारी 2007 रोजी दुपारी इकेजा नावाच्या लष्करी झावणीमध्ये सैनिक रोजच्या कसरती करत होते. त्यांचे कुटुंबीयसुद्धा याच लष्करी छावणीत राहत असत. लागोस शहरात ही छावणी असल्यामुळे छावणीच्या बाजूलाच मोठी बाजारपेठ होती. नेहमीप्रमाणे या बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ होती. मात्र, अचानक बाजारपेठेत एका ठिकाणी छोटी आग लागली. सुरुवातीला ही आग आटोक्यात येईल असे वाटले होते. पण नंतर आगीने रौद्र रुप धारण केल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. या आगीत संपूर्ण बाजारपेठ भस्मसात झाली.

आग छावणीपर्यंत आणि बॉम्बचा स्फोट

आग जिथे लागली त्या आगीच्या परिसरातच मोठी लष्करी छावणी होती. या छावणीमध्ये नाजयेरियाचे सैन्य आपल्या कुटुंबासोबत राहत असत. तसचे, इथे शस्त्रांचासुद्धा मोठा साठा होता. बॉम्ब, दारुगोळा, बंदुका अशा अनेक प्रकारची स्फोटकं या छावणीमध्ये होते. बाजारपेठेत लागलेली आग आटोक्यात येईल असं सुरुवातीला वाटलं होतं. मात्र, नंतर ही आग नियंत्रणाबाहेर गेली. आगीने छावणीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लागोसमध्ये मृत्यूंचा खच पडला होता.

आगीमुळे बॉम्बस्फोट, शेकडो मृत्यू

छावणीमध्ये एका शस्त्रागारात अनेक बॉम्ब ठेवलेले होते. बाजारपेठेमध्ये लागलेली आग या रुमपर्यंत पोहोचली. त्यानंतर विघातक स्फोटांमुळे छावणीत असणाऱ्या घरामध्येसुद्धा ही आग शिरली. शस्त्रागारात ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटामुळे 15 किमीपर्यंतच्या परिसरात की आग पोहोचली. तसेच भीषण स्फोटांमुळे लागोस शहरातील सर्व घरं नेस्तनाबुत झाली. पडलेल्या भिंती आणि छताखाली अनेक नागरिक दबले. एकीकडे आग आणि दुसरीकडे घरांच्या पडझडीमुळे हजारो नागरिक ढिगाऱ्याखाली दबळ्यामुळे सगळीकडे हाहाकार उडला.

इतिसाहासाच्या पानावरची ही एक अतिशय हृदयद्रावक घटना होती. छोट्याशा आगमीमुळे नायजेरीयात स्फोटांचं तांडव निर्माण झालं होतं. पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून येथे एकूण 600 नागरिकांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये अनेक महिला आणि बालकांचा समावेश होता. असं सांगितलं जातं की या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कित्येक मुलांचे मृतदेह नाल्यामध्ये वाहताना आढळले होते. लष्करी छावणीत आग शिरल्यामुळे येथे भीषण बॉम्बस्फोट झाले होते.

दरम्यान, या घटनेनंतर नायजेरीयाचे तत्कालीन राष्ट्रपती ओलुसेगुन ओबासांजो यांनी घटनास्थळी धाव घेत, लष्कराला जाब विचारला होता. वर्षभरापूर्वी सांगितलेलं असूनसुद्धा लागोसमधील शहरात ठेवलेली स्फोटकं हलवण्यात आली नव्हती.  त्यानंतर झालेल्या या चुकीची लष्कराने माफी मागितली होती. मात्र, या घटनेमुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता. 2002 आजच्याच दिवशी म्हणजेच 27 जानेवारी रोजी ही घटना घडली होती.

संबधित बातम्या :

नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात उभी फूट, पंतप्रधान ओलींची स्वपक्षातूनच हकालपट्टी

इमानदार ! मालक हॉस्पिटलमध्ये, दोस्तानं गेटवर ठाण मांडलं !

(in Nigeria lagos armoury explosion 27 january 2002, 1100 people died)