तेहरान | 15 ऑक्टोबर 2023 : इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर सुरु झालेल्या युद्धाचा भारतालाही मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळेच भारताने मध्य पूर्व येथील आपल्या सर्व भागीदारांशी संपर्क वाढवला आहे. इस्रायल आणि हमासचे युद्ध चिघळले तर भारतावर काय परिणाम होईल याची चाचपणी होत आहे. या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतील सगळी समीकरणे बदलून भारत-मध्य पूर्व युरोप कॉरिडॉर अडचणी आल्याचे बोलले जात आहे.
हमासच्या हल्ल्यामागे इराणची भूमिकाही संदिग्ध राहीली आहे. कारण या हल्ल्याचा जास्त फायदा इराणला होणार आहे. स्वत: हमासने इराणने मदत केल्याची कबूली दिली आहे. त्यानंतर तेहराणने यातून स्वत:चे अंग काढून घेतलंय. यानंतरही इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी आणि सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला अली खोमेनी यांनी हमासची पाठ थोपटली आहे. इराणने तर पॅलेस्टिनी नागरिक आणि हमास मदतीसाठी सौदी अरबच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशीही बोलणी केली आहेत.
फाऊंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रेसिजचे रिसर्च फेलो हुसैन अब्दुल-हुसैन यांनी म्हटलंय की इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यामागे पॅलेस्टिनींशी काही संबंध नसून अमेरिका प्रायोजित भारत-मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉरला ( आयएमईसी ) नुकसान पोहचविण्याची योजना होती. भारत-मध्य पूर्व युरोप हा एक व्यापारी मार्ग आहे. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरब, जॉर्डन आणि इस्रायलमधून भारताला युरोपशी जोडणारा मार्ग आहे. हा मार्ग आयएमईसी चीन आणि इराणच्या बेल्ट एण्ड रोड इनिशिएटीव्ह ( बीआरआय ) बरोबर स्पर्धा करणारा आहे. अशा परिस्थितीत इस्रायलसोबत सौदी अरब यांचा करार होऊ नये यासाठी हमासला इस्रायलवर हल्ला करण्यास इराणने प्रवृत्त केल्याचा आरोप हुसैन यांनी केला आहे.
येथे पहा ट्वीट –
Those who need evidence that Hamas’s attack on Israel had nothing to do with Palestinians, but was planned to sabotage the US-sponsored India Middle East Corridor (IMEC), a trade route that is planned to connect India to Europe through the UAE, Saudi Arabia, Jordan and Israel.…
— Hussain Abdul-Hussain (@hahussain) October 12, 2023
सैन अब्दुल हुसैन यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की इराणचे सर्वोच्च नेता अली खोमेनी यांचे प्रमुख सहकारी अली विलायती यांनी म्हटले आहे की, इस्रायलबरोबर आपले संबंध स्थापित करुन अन्य इस्लामी देशांशी फारकत घेण्याचा प्रयत्न जे देश करीत आहेत. त्यांना माहीती हवे की मध्य – पूर्व सारख्या संवेदनशील मार्गातून व्यापारी कॉरिडॉर बनवून ते देश या क्षेत्राची सुरक्षा धोक्यात आणत आहेत. अशा योजनांच्या प्रतिक्रीयांनी पॅलेस्टिनींच्या विरोधाने हे सिध्द झाले आहे की पश्चिमी वसाहतवादी प्रवृतींनी इस्रायलसाठी जे सुरक्षित घर तयार केले आहे ते कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही कमजोर आहे.