जकार्ता : इंडोनेशियाच्या नौदलाची पाणबुडी 53 सैनिकांसह बेपत्ता झालीय. समुद्रात युद्ध सराव करत असताना ही पाणबुडी गायब झालीय. प्राथमिक पातळीवर शोधाशोध करुनही पाणबुडी न सापडल्याने अखेर भारतीय नौदलाने या शोधासाठी आपली ‘डीप सबमर्जेंस रेस्क्यू व्हेसल (DSRV) यासाठी विशाखापट्टनम येथून रवाना केलीय. अशा प्रकारच्या पाणबुडीला शोधून त्यातील सैनिकांना वाचवण्यात या व्हेसलची खासियत आहे. त्यामुळे समुद्रात्या खोलवर गायब झालेल्या या पाणबुडीचा लवकरच शोध लागण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाची ही पाणबुडी जर्मनीत तयार झालेली असून ‘केआरआई नांग्गला-402’ असं तिचं नाव आहे. ही पाणबुडी बाली जलडमरूमध्य येथे सैन्य युद्ध सराव करत असताना गायब झाली (Indian Navy DSRV will help Indonesian Navy to rescue missing submarine)
भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, ” इंटरनॅशनल सबमरीन एस्केप अँड रेस्क्यू लायजन ऑफिसच्या (आयएसएमईआरएलओ) माध्यमातून इंडोनिशियाची पाणबुडी बेपत्ता झाल्याचा अलर्ट जारी झाला. यानंतर भारताने आपलं ‘डीप सबमर्जेंस रेस्क्यू व्हेसल (DSRV) इंडोनेशियाच्या नौदलाची पाणबुडी शोधण्यासाठी पाठवलंय.”
पाणबुडी शोधण्यासाठी अनेक देशांचे मिळून प्रयत्न
भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल म्हणाले, “भारतीय नौदलाने इंडोनेशियाची पाणबुडी केआरआई नंग्गलाच्या शोधासाठी शोध मोहिमेसाठी मदत म्हणून आपलं डीएसआरव्ही गुरुवारी रवानं केलंय. भारत जगातील निवडक देशांपैकी आहे ज्यांच्याकडे अशाप्रकारे गायब झालेली पाणबुडी शोधण्याची क्षमता असलेली डीएसआरव्ही प्रणाली आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 1000 मीटर खोलीपर्यंत गायब पाणबुडी शोधता येते. यासाठी आधुनिक स्कॅन सोनार सिस्टम (एसएसएस) आणि रिमोटने नियंत्रित वाहनाचा (आरओव्ही) वापर केला जातो.
बेपत्ता पाणबुडी शोधून लोकांना वाचवण्यात भारताचं DSRV निष्णात
बेपत्ता पाणबुडीचा शोध लावणे आणि त्यातील लोकांचा जीव वाचवण्यात भारतीय नौदलाचं डीएसआरव्ही निष्णात आहे. पाणबुडीचा शोध लागल्यानंतर डीएसआरव्हीमधील सबमरीन रेस्क्यू व्हेईकल (एसआरवी) पाणबुडीत अडकलेल्या लोकांना वाचवेल. एसआरवीचा उपयोग पाणबुडीत अडकलेल्या लोकांना आपतकालीन मदतीसाठी केला जातो. भारत आणि इंडोनेशियामध्ये व्यापक रणनैतिक भागीदारी असल्याने दोन्ही देशांच्या नौदलात सहकार्य आणि भागेदारी करार आहे.
जगात केवळ निवडक देशांकडेच हे तंत्रज्ञान
भारतीय नौदलाकडे असलेलं डीएसआरव्ही जगभरातील निवडक देशांकडेच आहे. 2018 मध्ये ते भारतीय नौदलात दाखल झालंय. समुद्रात खोलवर जाऊन लोकांना वाचवण्यात यातील यंत्रणा आणि तंत्रज्ञान निष्णात आहे. जगात भारताशिवाय हे केवळ अमेरिका, रशिया, चीन, जपान, ब्रिटन, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, इटली, फ्रांस, दक्षिण कोरिया आणि सिंगापूरकडेच आहे. हे मशीन एका वेळी 14 लोकांना वाचवू शकतं.
हेही वाचा :
INS Karanj : कलवरी श्रेणीतील INS करंज पाणबुडी नौदलाच्या सेवेत दाखल
चीनला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेची भारताला साथ, नौदलाला देणार शक्तिशाली बंदुका
व्हिडीओ पाहा :
Indian Navy DSRV will help Indonesian Navy to rescue missing submarine