भारताचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे. भारत हा सुखी संपन्न देश होता. त्यामुळेच भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं. भारताचा इतिहास हा तीन भागात विभागलेला आहे. एक म्हणजे प्राचीन इतिहास. दुसरा म्हणजे मध्ययुगीन इतिहास आणि तिसरा म्हणजे आधुनिक इतिहास. काही लोक भारताला भारतवर्ष म्हणून ओळखतात. काही लोक भारतखंड, आर्यावर्त, हिंदुस्थान, हिंद आणि जम्बुद्विप म्हणूनही भारताला ओळखलं जातं.
भारताचा इतिहास मोठा आहे. या देशात अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. अनेक आक्रमक या ठिकाणी राहून गेले. त्यामुळे काळानुसार भारताला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. आजही काही जुने लोक किंवा जुन्या दप्तरात भारताची जुन्या नावाने नोंद झालेली पाहायला मिळते. इतिहासकारांच्या ग्रंथातही भारताची वेगवेगळी नावे पाहायला मिळतात. कधी राजाच्या नावावरून भारताची ओळख पाहायला मिळते. तर कधी हिंदू धर्माच्या नावावरून भारताचे नाव पाहायला मिळते.
अफगाणिस्तान काय नावाने संबोधतो?
याशिवाय भारताला जगात इंडिया, तियानझू आणि हिमवर्ष अशा नावानेही ओळखलं जातं. पण अफगाणिस्तानचे लोक आपल्या देशाला कोणत्या नावाने ओळखतात माहीत आहे का? अफगाणिस्तानचे लोक भारताला कोणत्या नावाने ओळखतात हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अफगाणिस्तानचे लोक भारताला हिंदुस्तानच्या नावाने ओळखतात. अफगाणिस्तान एकेकाळी अखंड भारताचाच भाग होता. 7व्या शतकापर्यंत अफगाणिस्तान भारताचा भाग होता. त्याकाळात अफगाणिस्तानात अनेक हिंदू राजे होते. त्यांनी अफगाणिस्तानवर राज्य केलं आहे.
कल्लार या हिंदू राजा व्यतिरिक्त सामंतदेव, अष्टपाल, भीम, जयपाल, आनंदपाल, भीमपाल आणि त्रिलोचनपाल आदी प्रमुख राजे अफगाणिस्तानात होऊन गेले. हे सर्व राजे हिंदू होते. अफगाणिस्तान हे पूर्वीचे गांधार होते, असा महाभारतातही उल्लेख आढळतो.
भारत नाव कसं पडलं?
पौराणिक काळात भरत नावाचे अनेक लोक होते. राजा दशरथ यांचा मुलगा भरत, नाट्यशास्त्राचे उद्गाते भरतमुनी, राजर्षी भरत, भरत ऋषी, योगी भरत, पद्मपुराणानुसार दुराचारी ब्राह्मण भारत, दुष्यन्तपुत्र भरत आदी नावाचे राजे, ऋषी मुनी होऊन गेले. यांनीच विशाल साम्राज्याची निर्मिती करून अश्वमेध यज्ञ केला. त्यामुळे भारताला भारतवर्ष हे नाव मिळालं.