मुंबई | 3 जानेवारी 2024 : ड्रग्ज म्हणजेच अंमलीपदार्थांच्या तस्करीमुळे आपली भावी पिढी म्हणजे देशाचे भविष्यच उद्धवस्त होत असते. त्यामुळे अनेक देशात अंमली पदार्थांची तस्करीसारख्या प्रकरणात कठोर शिक्षा केली जाते. इराण याबाबती कठोर कायदा असणारा मुस्लीम देश आहे. येथे अफूचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या देशात अफू आणि चरस, गांजा याची तस्करी केली जाते. अफगाणिस्तानात अफूची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. इराणचे भौगोलिक स्थान अफगाणिस्तान आणि युरोप दरम्यान असल्याने आणि हा मार्ग तस्करीचा असल्याने येथेही अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. अलिकडेच इराणमध्ये अफूची तस्करी करताना 9 लोक आढळले. त्यांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे.
इराणमध्ये ड्रग्जची तस्करी करताना कोणी आढळला तर त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाते. अटक केलेल्या बहुतांशी आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. येथील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनूसार अंमलीपदार्थ तस्करी प्रकरणात 9 आरोपींना फाशीवर चढविण्यात आले आहे. जगात या गुन्ह्यासाठी दिलेली देहदंडाची शिक्षा सर्वौच्च शिक्षा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या गुन्ह्यासाठी थेट 9 जणांना फासावर देणे अपवादात्मक घडले आहे.
इराणची न्यूज एजन्सी IRNA च्या मते हिरॉईन आणि अफूच्या तस्करी प्रकरणाच्या आरोपाप्रकरणात इराणचे उत्तर – पश्चिम राज्य अर्दबीलच्या एका तुरुंगात तीन जणांना फाशीची शिक्षा दिली आहे. तर सहा अन्य आरोपींना मेथामफेटामाइन, हेरॉईन आणि कॅनबिस तस्करीत फाशीची स्वतंत्रपणे शिक्षा सुनावली आहे. इराण अफूची पैदास करणाऱ्या देशाच्या शेजारी असल्याने येथील तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या ड्रग्ज क्राईम ( UNODC ) च्या साल 2021 च्या डेटाच्या मते इराणमध्ये 2.8 दशलक्ष लोक अंमलीपदार्थांची नशा करतात. त्यामुळे इराण सरकारने ड्रग्जच्या विरोधात मोहिम सुरु केली आहे.
रनॅशनलच्या मते इराणमध्ये साल 2023 च्या आधी पाच महिन्यात ड्रग्ज तस्करी प्रकरणात 173 लोकांना फाशी दिली आहे. हे आकडे धक्कादायक आहेत. एका मानवी हक्क समुहाच्या मते इराणने साल 2023 मध्ये 700 हून अधिक लोकांना वेगवेगळ्या प्रकरणात देहदंड दिला आहे. इराणच्या मते येथे संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनचे मृत्यूदंड दिला जातो.