Iran- Israel War : अखेर इस्त्रायलने टाकला डाव; आण्विक केंद्रावर केले असे काही की इराण रडकुंडीला

| Updated on: Oct 12, 2024 | 3:59 PM

Massive Cyber Attack : इराणने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर योग्य वेळी धडा शिकवण्याचा इशारा इस्त्रायलने दिला आहे. त्याचीच एक छोटी चुणूक या छोट्या देशाने इराणला दाखवली आहे. इस्त्रायलच्या या एकाच हल्ल्याने इराण रडकुंडीला आला आहे. हिजबुल्लाहने तर अगोदरच नांगी टाकली आहे.

Iran- Israel War : अखेर इस्त्रायलने टाकला डाव; आण्विक केंद्रावर केले असे काही की इराण रडकुंडीला
इराण रडकुंडीला, इस्त्रायलचा नवा डाव
Follow us on

इराण आणि इस्त्रायलमध्ये सध्या विस्तव सुद्धा जात नाही. हमास नंतर इस्त्रायलने हिजुबल्लाहकडे मोर्चा वळवला. तर या संघटनेला रसद पुरवणाऱ्या इराणला धडा शिकवण्याचा चंगच इस्त्रायलने बांधला आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर योग्य वेळी धडा शिकवण्याचा इशारा इस्त्रायलने दिला आहे. त्याचीच एक छोटी चुणूक या छोट्या देशाने इराणला दाखवली आहे. इस्त्रायलच्या या एकाच हल्ल्याने इराण रडकुंडीला आला आहे. हिजबुल्लाहने तर अगोदरच नांगी टाकली आहे. आता इराण मेटाकुटीला आले आहे.

इराणमध्ये दिवसभर गडबड

इराण आणि इस्त्रायलमध्ये संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यातच आज इस्त्रायलने एक मोठा डाव टाकला. इराणच्या आण्विक ठिकाणासह सरकारी कार्यालयांना लक्ष्य केले. अर्थात इस्त्रायलने नव्या हत्याराचा उपयोग केला. इराणवर सायबर हल्ला चढवला. त्यामुळे इराणच्या सर्व सेवा विस्कळीत झाल्या. अंतर्गत संपर्काचं दळणवळण कोलमडलं. इराणच्या सायबरस्पेस या सर्वोच्च संस्थेचे माजी सचिव फिरोजबादी यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार न्यायापालिका, कार्यपालिका आणि संसदेचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे इराणची यंत्रणा मेटाकुटीला आली. या सायबर हल्ल्यात इराणच्या आण्विक तळांना पण लक्ष्य करण्यात आले. 1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र डागले होते. त्यानंतर त्याचा बदल घेण्याचा आणि प्रतिहल्ल्याचा इशारा इस्त्रायलने दिला होता.

हे सुद्धा वाचा

एक डाव धोबीपछाड

इस्त्रायल कोणता हल्ला करणार याची जगभरात चर्चा सुरू होती. पण इस्त्रायलने आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे इराणवर हल्ला केला. त्यात इराणला केव्हा हादराच दिला नाही. तर त्यांच्या सर्व संस्थांमधील महत्त्वपूर्ण माहिती चोरीला गेल्याचे समोर आल्याने इराण प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. इराण इंटरनॅशनलने याविषयीचे वृत्त माजी सचिव फिरोजाबादी यांच्या दाव्याआधारे दिले आहे. त्यानुसार इराणची न्यायपालिका, कायदेमंडळ आणि प्रशासकीय मंडळावर सायबर हल्ला झाला. आण्विक केंद्राला लक्ष्य करण्यात आले. त्यात तिथली महत्त्वाची माहिती चोरण्यात आली. या एकाच निशाण्याने इराण गर्भगळीत झाला आहे. एकदम घातक आणि आश्चर्यकारक प्रत्युत्तर देऊ असे इस्त्रायलने म्हटले होते. त्याने जगाची चिंता वाढवली होती. इस्त्रायल इराणच्या आण्विक प्रकल्पावर हल्ला चढवू नये, अशी प्रार्थना होत होती. आता इस्त्रायलच्या य मास्टरस्ट्रोकने इराणची अंतर्गत यंत्रणा ठप्प पडल्याचे समोर येत आहे.