अणुबॉम्ब हवेतच नष्ट करणार इस्त्रायलचा आर्यन डोम? आतापर्यंत शत्रूंचे 90 टक्के रॉकेट केले नष्ट

| Updated on: Oct 03, 2024 | 10:52 AM

Israel Iron Dome : इस्त्रायलचा आर्यन डोम शत्रूंशी सामना करण्यासाठी मैलाचा दगड ठरले आहे. या डोम प्रणालीने आतापर्यंत शत्रूंचे 90 टक्के रॉकेट हवेतच नष्ट केले आहे. Iran ने 200 क्षेपणास्त्र डागले, ते हवेतच नष्ट झाले. मग आर्यन डोम अणूबॉम्ब पण हवेत नष्ट करु शकणार का?

अणुबॉम्ब हवेतच नष्ट करणार इस्त्रायलचा आर्यन डोम? आतापर्यंत शत्रूंचे 90 टक्के रॉकेट केले नष्ट
काय आहे आर्यन डोम प्रणाली?
Follow us on

इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे युद्धाचा भडका उडाला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे ढग आहेत. मंगळवारी रात्री उशीरा इराण देशाने इस्त्रायलवर एका मागून एक सलग 200 क्षेपणास्त्र डागले, ते हवेतच नष्ट झाले. त्यातील काही क्षेपणास्त्र जमिनीवर येताच नष्ट झालीत. इस्त्रायलची संरक्षण प्रणाली आर्यन डोमने त्यासाठी मोलाची भूमिका बजावली. इस्त्रायलचे संरक्षण कवच मोठ्या कामी आले. मोठं मोठी क्षेपणास्त्र या संरक्षण प्रणालीने हवेतच नष्ट केली आहे. ही संरक्षण प्रणाली कोणत्याही हल्ल्याचा अगोदरच अंदाज घेऊन त्याला हवेतच नष्ट करते. मग अनेकांच्या मनात प्रश्न असेल की हे तंत्रज्ञान अणुबॉम्ब सुद्धा हवेतच नष्ट करू शकते का? काय आहे या प्रश्नाचं उत्तर?

कसे काम करते आर्यन डोम ?

आर्यन डोम जगातील सर्वाधिक लोकप्रिय हवाई संरक्षण प्रणाली आहे. संपूर्ण इस्त्रायलमध्ये आर्यन डोम बॅटरी बसवण्यात आल्या आहेत. प्रत्येक बॅटरीत तीन ते चार लाँचर असतात. त्यात 20 इंटरसेप्टर मिसाईल असतात. आर्यन डोम रडार प्रणालीवरुन आलेल्या रॉकेटचा मागोवा घेते. त्यावर लक्ष ठेवते. त्याची संख्या मोजते. त्याची दिशा कोणती, शहरी भागावर येणाऱ्या क्षेपणास्त्रावर, दाट लोकवस्तीच्या दिशेने येणाऱ्या रॉकेटवर त्याचे लक्ष असते. त्यानंतर ही प्रणाली लागलीच सतर्क होते आणि हल्ल्याला प्रत्युत्तर देते. इस्त्रायल सुरक्षा दलाच्या (IDF) दाव्यानुसार, आर्यन डोम लक्ष्यावरील 90 टक्के रॉकेट नष्ट करतो. त्यासाठीच्या तामिर या क्षेपणास्त्रांची किंमत जवळपास 50,000 डॉलर प्रति क्षेपणास्त्र इतकी असल्याचा दावा करण्यात येतो. भारतीय चलनात ही रक्कम 41,97,055 रुपये इतकी होते.

हे सुद्धा वाचा

केव्हा दाखल झाली ही प्रणाली?

इस्त्रायलने ही प्रणाली विकसीत केली होती. 2006 मध्ये इस्त्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध झाले. त्यानंतर ही प्रणाली इस्त्रायलने लावली. त्यामुळे क्षेपणास्त्राचा मारा केल्यानंतर ते हवेतच नष्ट होते. लेबनॉन या देशाच्या सशस्त्र संघटनेने इस्त्रायलवर जवळपास 4,000 रॉकेटचा मारा केला आहे. त्यात काही नागरीक मारल्या गेले. तर काही ठिकाणी नुकसान झाले. पण आर्यन ड्रोमने मोठे नुकसान आणि जीवित हानी टाळली आहे.

अणुबॉम्ब हवेतच नष्ट करू शकते आर्यन डोम?

अणुबॉम्ब आर्यन डोम हवेतच नष्ट करु शकते का? तर नाही. कारण ही एक ती एक अँटी रॉकेट आर्टिलरी, मोर्टार, ड्रोन आणि क्रूज मिसाईल डिफेंस सिस्टम आहे. तर बॅलेस्टिक मिसाईलविरोधात अजून या देशाकडे सुरक्षा प्रणाली नाही. पण ICBM चा मारा परतवण्यासाठी एरो 3 आणि THAAD ही प्रणाली आहे.