ईराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. त्यात रईसी यांचा मृत्यू झाला आहे. रईसी यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते. त्यापैकी त्यांचंच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रईसी यांचं हेलिकॉप्टर शोधण्यात आलं आहे. या घटनेमुळे जगभर खळबळ उडाली आहे. रईसी यांच्या हेलिकॉप्टरला खरोखरच अपघात झाला की हा घातपात होता? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. इब्राहिम रईसी यांनी अनेक देशांना मदत केली होती. कोण होते रईसी? याचा घेतलेला हा आढावा.
राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांना ईराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खुमैनी यांचे उत्तराधिकारी मानलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टर अपघातावर मोठा सवाल केला जात आहे. इब्राहिम रईसी यांचा जन्म 1960 रोजी झाला होता. उत्तर पूर्वे ईराणच्या मशहद शहरात त्यांचा जन्म झाला होता. रईसी यांचे वडील मौलवी होते. परंतु, रईसी पाच वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. रईसी यांचा सुरुवातीपासूनचा कल धर्म आणि राजकारणाकडे राहिला होता. विद्यार्थीदशेत असताना मोहम्मद रेजा शाह यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनात ते रस्त्यावर उतरले होते. रेजा शाह यांना पश्चिमेकडील देशांचे समर्थक मानले जात होते.
15 व्या वर्षापासून शिक्षण
मशहद शहरात शिया मुसलमानांची सर्वात पवित्र मानली जाणारी मशीद आहे. रईसी अत्यंत कमी वयात उच्च पदावर गेले होते. त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत 15 व्या वर्षापासूनच कोम शहरातील एका शिया संस्थेत शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. मोहम्मद रेजा शाह यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. नंतर अयातोल्ला रुहोल्ला खुमैनी यांनी इस्लामिक क्रांती केली होती. 1979 मध्ये ही क्रांती झाली होती. त्यामुळे शाह यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते.
2021मध्ये राष्ट्रपतीपदी