इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाल आहे. इराणच्या आण्विक शक्तीची चिंता सर्वांना लागली आहे. गेल्या काही वर्षांत इराणने वेगाने आपला अणू कार्यक्रम राबविला आहे. इराणने आपला अणू कार्यक्रम साल 1950 मध्ये सुरु केला होता. परंतू जेव्हा इराण अणू बॉम्ब बनविण्याच्या अत्यंत जवळ पोहचल्याचा आरोप जेव्हा पाश्चात्य जगाने केला तेव्हा जगाला ही बाब कळली. इस्रायली सैन्य आपले ट्रुथफुल प्रॉमिस-2 ऑपरेशन लॉंच करु शकते असे म्हटले जात आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अनेकदा इराणवर अण्वस्र तयार करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल दोघांनाही इराण पासून धोका वाटत आहे. त्यामुळे इराणच्या आण्विक तळांवर हल्ले करण्या संदर्भातील विधाने केली जात आहेत. परंतू इस्रायलसाठी इराणवर अण्वस्र ठिकाणांवर हल्ला करणे हे सोपे नाही ? का ते पाहूयात….
इराणचे आण्विक तळ भूमिगत असून डोंगरात लपलेले आहे. बंकर बस्टर बॉम्ब देखील तेथे उपयोगी नसल्याचे म्हटले जात आहे. इराणच्या अणू भट्ट्या इस्रायलपासून 2000 किलोमीटर दूरवर आहेत. त्यामुळे इस्रायलच्या लढाऊ विमानांना पुन्हा इंधन भरावे लागेल. इस्रायली विमानांना इराणच्या न्युक्लिअर अड्ड्यांपर्यंत पोहचण्यासाठी सौदी अरब,सिरीया या सारख्या देशांच्या हवाई हद्दीतून जावे लागेल. तसेच इराण त्याचा आण्विक कार्यक्रम इतक्या ठिकाणी पसरविला आहे की त्यांना संपूर्ण नष्ट करणे शक्य नाही. इराण मिसाईल आणि ड्रोन तळांना जमीनीच्या आता डोंगरात लपवून ठेवले आहे. त्यामुळे त्यांना संपुर्णपणे नष्ट करणे इस्रायलला शक्य नाही. त्यांना थोडेफार नुकसान होऊ शकते. या स्थितीत इराणच्या एअर डिफेन्स ठिकाणांवर हल्ले करणे इस्रायलला शक्य आहे.
इराणवर विध्वंसक हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल आहे. या हल्ल्यासाठी इस्रायलच्या वॉर कॅबिनेटने मंजूरी दिलेली आहे. आयडीएफचे ऑपरेशन ‘ट्रूथफुल प्रॉमिस-2’ लवकरच लॉंच होऊ शकते. इराणच्या बॉर्डरवर इस्रायलचे F-35 फायटर जेट्स उडताना दिसले आहेत. फारस खाडीत चार इस्रायलचे F-35 फायटर जेट्स दिसले आहेत.इराणची एअर डिफेन्स सिस्टीम रेडी टू अटॅक मोडवर आहे.
लेबनॉनमध्य इस्रायलचे ग्राऊंड ऑपरेशन सुरु असून गेले आठवडाभरापासून तेथे इस्रायल हल्ले करीत आहे. हवाई हल्ल्यासोबतच इस्रायलचे जमीनी कारवाई सुरु झाली आहे. हेजबोलाच्या सदस्यांना वेचून ठार केले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार असला तरी त्यांना इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करण्यासाठी आम्ही पाठींबा देणार नसल्याचे बायडन यांनी म्हटले आहे.