हमाससोबत युत्ध सुरु असतानाच आता इस्त्रायल दुसऱ्या आघाडीवर पण व्यस्त झाला. इस्त्रायल सैन्याने क्षिण लेबनॉनच्या रहिवाशांना अगोदर अरबी भाषेत, तुम्ही धोक्यात असल्याचा इशारा दिला. त्यानंतर ताबडतोब अनेक ठिकाण्यावर जोरदार हल्ला चढवला. तर हिजबुल्लाहने पण लागलीच प्रत्युत्तर दिले. इस्त्रायलवर क्षेपणास्त्राचा पाऊस पाडला. त्यानंतर आता इस्त्रायल दोन आघाड्यांच्या युद्धात गुंतल्याने आणीबाणी जाहीर करण्यात आली.
इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांचा पाऊस
हिजबुल्लाहने इस्त्रायलवर एका पाठोपाठ एक क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यात इस्त्रायलवर जवळपास 150 लहान-मोठे क्षेपणास्त्र डागण्यात आले. इस्त्रायल सैन्याने पण लागलीच प्रत्युत्तर दिले. त्यांनी हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले. त्यापूर्वी दक्षिण लेबनॉनच्या रहिवाशांना अरबी भाषेत तुम्ही धोक्यात असल्याची सूचना देण्यात आली. या भागात सातत्याने सायरनाचा भोंगा घोंगावत आहे. रविवारी भल्या पहाटे इस्त्राईली सैन्याने लेबनॉनच्या सीमा भागात धडक मोहीम राबवली. त्यांनी हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले.
इस्त्रायलच्या मुख्य लष्करी तळ, संरक्षक कवच डोम आणि इतर सैन्य स्थळावर हल्ला चढवल्याचा दावा हिजबुल्लाहने केला आहे. तर आम्ही केवळ दहशतवाद्यांच्या अड्डयांवर, ठिकाण्यांवर हल्ला चढवला. आम्ही रहिवाशी स्थळांना लक्ष्य केले नाही. पण हिजबुल्लाह सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप इस्त्रायलने केला आहे.
Hezbollah has just launched over 150 projectiles from Lebanon toward Israeli territory.
We target terrorist infrastructure, they target civilians.
— Israel Defense Forces (@IDF) August 25, 2024
बदला घेण्यासाठी हल्ला
लेबनॉनच्या हिजबुल्लाहने रविवारी सकाळी हल्ल्याची पुष्टी केली. बैरुत येथे त्यांच्या कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्त्रायलवर हल्ला चढवल्याचा दावा त्यांनी केला. बैरूत येथील दक्षिणेतील एका उपनगरात हिजबुल्लाहचा वरिष्ठ अधिकारी फवाद शुक्र हा ठार झाला होता. त्यानंतर हिजुबल्लाहने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र डागले. या ताज्या हल्ल्याने दोघात युद्ध पेटले आहे. इस्त्रायल आता दोन आघाड्यांवर युद्धाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे या भागात शांतता नांदण्याची शक्यता धूसर झाली आहे.
अमेरिकेचे घाडमोडींवर बारीक लक्ष
या नवीन धुमश्चक्रीवर अमेरिका नजर ठेऊन आहे. इस्त्रायल-हिजबुल्लाह यांच्यातील तणावावर अमेरिकेचे लक्ष असल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केले. इस्त्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकारांचे आपण समर्थन करत असल्याचे बायडेन यांनी सांगितले. त्याचवेळी या भागात शांतता नांदावी हा पण अमेरिकाचा प्रमुख उद्देश असल्याचे ते म्हणाले.