इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये सध्या युद्धाची स्थिती आहे. इराणने काल इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यानंतर आता इस्रायलकडूनही जशाच तसं उत्तर देण्याची तयारी सुरु झाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणला इशारा दिला आहे. इराणने आज आमच्यावर हल्ला करून फार मोठी चूक केली आहे. त्यांना याची भरपाई करावी लागेल, असं बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. इराणने आमच्यावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. आता आम्ही या हल्ल्याला उत्तर देणार आहोत. आमचा प्लॅनही तयार आहे. आता जागा आणि वेळ आम्ही ठरवू… अशा शब्दात इस्रायलने इराणला इशारा दिला आहे.
इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. इस्रायलच्या लष्कराने याबाबतचं निवेदन प्रसिद्ध केलं आहे. इराणने आतापर्यंत 180 क्षेपणास्त्रांनी आमच्यावर हल्ला केला आहे. यातील अनेकवेळा आम्ही त्यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. यावेळी इराणने आज आमच्यावर हल्ला करून फार मोठी चूक केली आहे. त्यांना याची भरपाई करावी लागेल, असं म्हणत इस्रायलने इराणला प्रत्युत्तर दिलंय.
इराणने 180 क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ माजली. इस्रायलची राजधानी तेल अवीवजवळच्या जाफामध्ये गोळीबार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात 8 लोकांनी प्राण गमावल्याचा दावा केला जात आहे.
17 सप्टेंबर इस्रायलने लेबनॉनमध्ये पेजर्स आणि वॉकी- टॉकींमध्ये स्फोट घडवले होते. या स्फोटामध्ये 39 जणांचा मृत्यू झाला आहे. यात हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या लोकांचा समावेश होता. तसंच सामान्या नागरिकांनाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला होता. हिजबुल्लाह संघटनेचे नेते हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर पण इस्रायल लेबनॉनवर सातत्याने हल्ला करत राहिला. अमेरिकेकडून शांततेचं आवाहन करण्यात आल्यानंतरही इस्लायलने हल्ले सुरुच ठेवले. आता इराणने क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर इस्लायल देश पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आला आहे. भरपाई करावी लागेल, अशा शब्दात इराणला इशारा दिला आहे.