Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. यादरम्यान विविध धक्कादायक (Shocking) व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत आहेत. त्यात आता एका मुलीची व्हिडिओ समोर आलाय. बॉम्बहल्ल्यात एक चिमुरडी गंभीर जखमी झाल्याचा हा व्हिडिओ आहे. मात्र हा युक्रेनमधला व्हिडिओ नसून पॅलेस्टाइन इस्त्रालय यांच्यातल्या संघर्षादरम्यानचा असल्याचे समोर आले आहे. युरोपीयन-अमेरिकनांना इस्रायल पॅलेस्टाइनपेक्षा युक्रेन महत्त्वाचा आहे, अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. मनवर बुरकान, पूर्व जेरुसलेममधील 11 वर्षांची मूकबधिर मुलगी सोमवारी दुपारी अल-अक्सा मशिदीमध्ये तिच्या कुटुंबासह प्रार्थनेसाठी जात असताना एका पोलीस अधिकाऱ्याने गोळीबार केलेला साउंड ग्रेनेड तिच्या चेहऱ्यावर पडला. त्यात ती जखमी झाली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अल-इसरा वा अल-मिराज साजरा करण्यासाठी हजारो पॅलेस्टिनी जुन्या शहराच्या प्रवेशद्वारावर जमले होते.
तिचे वडील याकूब बुरकान म्हणाले, “ती तिच्या आई आणि बहिणींसोबत अल-अक्सा येथे प्रार्थना करण्यासाठी जात होती. ते नुकतेच तेथून जात होते आणि मग हे सर्व घडले. सर्वजण अल-अक्सामध्ये जातात. ते महिला आणि मुलांनी भरलेले असते.” दरम्यान, न्याय मंत्रालयाच्या पोलीसअंतर्गत तपास विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याची घोषणा केली आहे.
दमास्कस गेटजवळ पॅलेस्टिनी आणि पोलिसांमध्ये त्यादिवशी दुपारी चकमक सुरू झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पॅलेस्टिनींनी चिथावणीखोर घोषणा दिल्या. घटनास्थळी पोलिसांवर दगडफेक केली, बाटल्या फेकल्या. पोलिसांनी पॅलेस्टिनींच्या गटांना स्टन ग्रेनेड आणि तोफांमधून तीव्र-गंधयुक्त उच्च-दाब पाण्याचे स्फोट करून पांगवले. महिला, मुले आणि व्हीलचेअरवर बसलेल्या पुरुषासह डझनभर तिथे होते.
साउंड ग्रेनेडपैकी एक 11 वर्षीय बुरकानच्या चेहऱ्यावर फुटला. हदासाहच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी तिला ताबडतोब जेरुसलेमच्या हदासाह ईन केरेम मेडिकल सेंटरमध्ये आहे त्या स्थितीत नेले. “जेव्हा धुमश्चक्री सुरू झाली, तेव्हा सर्वजण सैरावैरा पळू लागले. त्यात ती कुठे आहे, हे कोणालाच लक्षात आले नाही, असे बुरकानचे वडील म्हणाले.
#Israel throwing grenade to Palestine girl. But US & Europe will turn their eyes away. Ukrainians are more important than Palestinians ?#Ukraine #UkraineRussia #Kyiv #RussiaUkraine #Russian #UN pic.twitter.com/5pJ9wYqvqq
— mumthaz Adam (@AdamMumthaz) March 1, 2022
मनवर पूर्व जेरुसलेमच्या शुआफत परिसरात राहते. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, तिच्याकडे कॉक्लियर इम्प्लांट आहे जे तिला ऐकण्यास किंचित मदत करते, तरीही ती बहिरी आणि मूक असते. ती बीट सफाफा येथील एका विशेष गरजेच्या शाळेत शिकते. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, मनवरवर मंगळवारी दुपारी शस्त्रक्रिया झाली. परंतु तिचे कुटुंब अद्याप चिंतेत आहे. पॅलेस्टिनी रेड क्रिसेंटच्या म्हणण्यानुसार, चकमकीदरम्यान सुमारे 25 पॅलेस्टिनी जखमी झाले. इस्रायल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 पॅलेस्टिनींना अटक करण्यात आली असून चार अधिकारी जखमी झाले आहेत. दमास्कस गेटजवळ पॅलेस्टिनी आणि इस्रायली सैन्यांमध्ये वारंवार संघर्ष सुरू आहे.
A Palestinian girl was injured by a stun grenade fired by Israeli Occupation Forces. She has been hospitalized, we are waiting for updates regarding her situation. #FreePalestine pic.twitter.com/QAz3ydeUJW
— Mohammed El-Kurd (@m7mdkurd) February 28, 2022