israel hamas war | इस्रायल नागरिकांना वाटतोय बंदूका, लढाई धोकादायक वळणावर आल्याचा अमेरिकेचा इशारा

| Updated on: Oct 28, 2023 | 12:53 PM

इस्रायलने हमासच्या अतिरेक्यांविरोधात सुरु केलेले युद्ध आाता धोकादायक स्थितीत पोहचले आहे. आता या युद्धात मोठी हानी होणार असून इस्रायलने आपल्या नागरिकांना युद्धाचे प्रशिक्षण देणे सुरु केले आहे.

israel hamas war | इस्रायल नागरिकांना वाटतोय बंदूका, लढाई धोकादायक वळणावर आल्याचा अमेरिकेचा इशारा
israel army
Image Credit source: socialmedia
Follow us on

तेल अवीव | 28 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमासचे युद्ध 22 व्या दिवसांवर पोहचले आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूंनी मोठी मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत 9 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आता इस्रायल आपल्या नागरिकांना युद्धासाठी तयार करीत आहे. त्यांना प्रशिक्षण देत आहे. इस्रायलच्या पोलिस मंत्री इतामार बेन ग्विर यांनी दक्षिणी इस्रायली शहर अश्कलोनच्या रहीवाशांनी शस्रे वाटली आहेत. युद्धाच्या पुढच्या टप्प्यासाठी इस्रायल सज्ज होत आहे. संयुक्त राष्ट्र संघातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी आम्ही एका धोकादायक वळणार आहोत. इस्रायल आणि पॅलेस्टाईन लोकांसाठी हा धोकादायक क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र संघातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी पुढे सांगितले की जसे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काल म्हटले होते 6 ऑक्टोबरच्या स्थितीत आता परत जाता येणे शक्य नाही. हमासने इस्रायलवर अमानुष हल्ला करुन पॅलेस्टिनी नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केला आहे. या वादातून आता मार्ग काढावा लागणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. टू स्टेट सोल्युशनच्या आसपास हा वाद सुटला पाहीजे असे त्यांनी म्हटले आहे. इस्रायली आणि पॅलेस्टिनी संघर्षात मोठे यश देखील दृष्टीक्षेपात आले आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की कतारमध्ये हमासच्या साथीदारांवर अमेरिका हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

इस्रायलचा उत्तरी गाझात प्रवेश

इस्रायलने उत्तरी गाझात प्रवेश करीत आहे. इस्रायलचे सैन्य तीन दिशांनी बिट हनौनच्या दिशेने शिरत आहे. हमासशी होणाऱ्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एस्क्लोन बंदर आणि तेथील तेल टर्मिनल बंद केले आहे. त्यानंतर इस्रायली सागरी पोलिसांनी इस्रायल आणि गाझा दरम्यानच्या सीमेवर हल्ला केला आहे. जॉर्डनच्या परराष्ट्रमंत्री अयमान अल-सफादी यांनी म्हटले की इस्रायलने गाझापट्टी मैदानी लढाई सुरु केली असून त्यामुळे मोठी हानी होणार आहे.

आतापर्यंत 8,800 जण ठार

इस्रायली आणि पॅलेस्टिनी संघर्षात आतापर्यंत 8,800 जण ठार झाले आहेत. गाझा पट्टी आणि वेस्ट बॅंक येथे एकूण 7,436 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. यात गाझापट्टीत 7,326 आणि वेस्ट बॅंक येथे 110 जणांचे प्राण गेले आहेत. किनारपट्टीच्या भागात 18,967 पॅलेस्टिनी जखमी झाले आहे. इस्रायली आरोग्य विभागाच्या माहितीनूसार 18 ऑक्टोबरपर्यंत 1,400 हून अधिक इस्रायली ठार झाले आहेत.