Video | गोळी लागली आहे, I LOVE YOU : दहशतीखालील तरुणीचा शेवटचा कॉल, समोर होते HAMAS चे अतिरेकी

| Updated on: Oct 15, 2023 | 9:09 PM

या मुलीचा आवाज हृदयात कालवाकालव करणारा आहे. या तिच्या कापऱ्या आवाजावरुन तिच्यावर काय प्रसंग गुदरला असेल याची कल्पना येते.

Video | गोळी लागली आहे, I LOVE YOU : दहशतीखालील तरुणीचा शेवटचा कॉल, समोर होते HAMAS चे अतिरेकी
supernova fest
Image Credit source: socialmedia
Follow us on

जेरुसलेम | 15 ऑक्टोबर 2023 : हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर लोकांना त्यांच्या घरात घुसून मारले. सुपरनोव्हा नावाच्या म्युझिक फेस्टीव्हलसाठी अनेक देशातून लोक आले होते. हा फेस्टीव्हल दक्षिण इस्रायलच्या येगेव डिजर्टमध्ये आयोजित केला होता. येथून अनेक लोकांचे अतिरेक्यांनी अपहरण केले. येथेच अतिरेक्यांनी कौर्याचा कळस गाठला. जगभरातून 3500 हून अधिक तरुण-तरुणी आले होते. येथे 260 मृतदेह सापडले आहेत.

इस्रायल सरकारने एक कॉल रेकॉर्डींग जारी केले आहे. या व्हिडीओत एका मुलीचा आवाज ऐकायला मिळतो. या मुलीला हमासच्या अतिरेक्यांनी नंतर गोळ्या घालून ठार केले. जेव्हा अतिरेकी तिच्या समोर होते,तेव्हा तिने आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन केला होता. त्यात ती म्हणते, त्यांनी माझ्या हातावर गोळ्या मारल्या आहेत, ‘शिमन, मी मरत आहे…..आय लव्ह यू.’ तिला अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या होत्या. ट्वीटरवर हे कॉल रेकॉर्ड इस्रायल सरकारने पोस्ट केले आहे. त्यास त्यांनी कॅप्शन लिहीली आहे, ‘तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐका. तिच्या रडण्याचा आवाज ऐका. हा हमासच्या दहशतीला बळी गेलेल्या पीडीतेचा असली आवाज आहे.

या मुलीचा आवाज हृदयात कालवाकालव करणारा आहे. या घाबरलेल्या तिच्या आवाजावरुन तिच्यावर काय प्रसंग गुदरला असेल ते लक्षात येऊ शकते. ती खूपच घाबरलेली होती. हा म्युझिक फेस्टीव्हल तिच्या प्रमाणे अनेकांचा अखेरचा ठरला. हा फेस्टीव्हल इस्रायलच्या दक्षिण भागात येगेव वाळवंटात आयोजित केला होता.

.येथे पाहा इस्रायल सरकारने शेअर केलेला व्हिडीओ –

इस्रायल सरकार सातत्याने आपल्या सोशल मिडीया हॅण्डलवरून अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करून जगाला हमासच्या अतिरेक्यांनी त्यांच्या सोबत काय केले ते सांगत आहे. हमासच्या हल्ल्यात इस्रायलचे 1300 हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. तर इस्रायलने प्रत्त्युत्तरादाखल गाझावर केलेल्या कारवाईत 2200 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाल्याचे समजते.