तेल अविव | 31 जानेवारी 2024 : हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी हल्ला केल्यानंतर इस्रायलने गाझापट्टीवर मोठा हल्ला करीत युद्ध छेडले आहे. या युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाली आहे तरी गाझापट्टीत लपलेले हमासचे अतिरेकी काही केल्या शरण आलेले नाहीत. त्यामुळे अखेर इस्रायली डिफेन्स फोर्सने आता ‘उंगली तेडी’ करण्याचा निर्णय घेतला आहे. हमासचे अतिरेकी लपण्याचे अड्डे असलेल्या त्यांच्या भुयारात आता इस्रायलने भूमध्य समुद्राचे पाणी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गाझातील 800 हून अधिक भुयारात पाणी भरले जाणार आहे. यासाठी इस्रायलने पंप देखील बसविले आहेत.
अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये या संदर्भात बातमी आली आहे. इस्रायली सैन्याने पाच मोठे पंप भूमध्य समुद्राजवळ बसविले आहे. याद्वारे भुयारात समुद्राचे पाणी भरले जाणार आहे. हे पंप अल-शाती रेफ्युजी कॅंपच्या उत्तरमध्ये लावले होते. तेथे सुमारे दीड किलोमीटर लांब पाईपलाईन टाकली आहे. प्रत्येक पंपाची ताकद हजारो क्युबिक मीटर पाणी दर तासाला खेचण्याची क्षमता आहे. गाझापट्टीतील या भुयार लपून हमासचे अतिरेकी गमिमी काव्याने इस्रायली सैन्याशी लढा देत आहेत. या प्रकल्पाबाबत इस्रायलने अजूनही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही. गाझामध्ये पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे अनेकांना हा प्रकल्प गाझातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी असावा असे वाटत होते.
या भुयारात पाणी भरण्यापूर्वी त्याची नीट तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे ओलिसांची सुटका करणे सोपे होणार आहे. त्यानंतर त्यात कोणताही इस्रायली नागरिक नसल्याचे पाहूनच त्यात शेवटी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच या भुयारात पाणी गेल्यानंतर त्या टीकणार नाहीत असेही म्हटले जात आहे. काही महिन्यांनी ही भुयारे एकतर पाणी शोषून घेतील किंवा कमजोर होऊन नष्ट होतील असे म्हटले जात आहे.
समुद्राचे पाणी अशा प्रकारे भुयारात टाकल्याने शहरातील पाणी पुरवठा आणि सिवेज सिस्टीमवरही परिणाम होईल असे म्हटले जात आहे.तसेच या प्रयोगाने गाझाच्या अंडरग्राऊंड पाण्याच्या भुजल स्तरावर याचा काय विपरित परिणाम होईल याचा विचार करावा लागणार आहे.