Cyber Attack : जपानमध्ये सायबर अटॅकमुळे विमानसेवा विस्कळीत, तिकीट विक्री थांबवली, प्रवासी विमानतळावर ताटकळले

| Updated on: Dec 26, 2024 | 9:21 AM

Japan Airlines Cyber ​​Attack : जपानमधील विमानसेवा विस्कळीत झाली आहे. पूर्वेतील या देशाच्या विमान सेवेवर सायबर हल्ला झाला आहे. त्यामुळे विमान सेवा प्रभावित झाली आहे. या सायबर अटॅकमुळे विमानतळावरील तिकीट काऊंटवर बंद झाले आहेत. तर प्रवासी ताटकळले आहेत.

Cyber Attack : जपानमध्ये सायबर अटॅकमुळे विमानसेवा विस्कळीत, तिकीट विक्री थांबवली, प्रवासी विमानतळावर ताटकळले
जपानमध्ये विमान जमिनीवर, सायबर हल्ला
Follow us on

पूर्वेतील जपान देशाची दळणवळण सेवा विस्कळीत झाली आहे. या देशाच्या विमान सेवेवर सायबर हल्ला झाला आहे. त्यामुळे विमान सेवा प्रभावित झाली आहे. या सायबर अटॅकमुळे विमानतळावरील (Cyber attack on Japan Airlines) तिकीट काऊंटवर बंद झाले आहेत. तर प्रवासी ताटकळले आहेत. आज सकाळी 7:24 वाजता हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामागे कोण आहे, सेवा सुरळीत होण्यासाठी प्रवाशांना किती तास वाट पाहावी लागणार आहे, याची माहिती समोर आलेली नाही.

विमानसेवेला मोठा फटका

हे सुद्धा वाचा

जपान एअरलाईन्सने याविषयीचे एक ट्विट केले आहे. त्यानुसार, 7:24 वाजता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानसेवेला फटका बसला आहे. सायबर हल्ल्यामुळे तिकीट विक्री सिस्टिम प्रक्रिया ठप्प झाली आहे. तिकीट विक्रीसाठीची नोंदणी आणि इतर अंतर्गत सेवा प्रभावित झाली आहे. विमान सेवेच्या वेळा अपडेट होत नसल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. तर ज्यांना इतर ठिकाणी, शहरात जायचे होते, ते हजारो प्रवासी विमानतळावर ताटकळले आहे. तिकीट विक्री सध्या बंद करण्यात आली आहे. सायबर तज्ज्ञ समस्या सोडवण्यासाठी मदतीला धावले आहे. लवकरच ही समस्या सोडवण्यात येईल, असा विश्वास एअरलाईन्सने व्यक्त केला आहे.

जपान एअरलाईन्स देशातील दुसरी सर्वात मोठी एअरलाईन

जपान एअरलाईन्स (JAL) ही ऑल निप्पॉन एअरवेज (ANA) नंतर, या देशातील दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी आहे. जपानमध्ये सायबर अटॅक पहिल्यांदाच झाला असे नाही. यापूर्वी सुद्धा सायबर हल्ला करण्यात आला आहे. यावर्षी जून महिन्यात जपानमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म निकोनिकोवर सायबर हल्ला झाला होता. हा व्हिडिओ-ऑडिओ प्लॅटफॉर्म आहे. सायबर हल्ल्यामुळे सर्व सेवा निलंबित करण्यात आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी सुद्धा इतर सेवा आणि प्लॅटफॉर्मच्या सेवा सायबर हल्ल्यामुळे विस्कळीत झाल्या होत्या.

वर्षाअखेरीस हल्ला झाल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. अनेकांनी सुट्यांसाठी अगोदरच बुकिंग केले होते. काही जण देशाच्या विविध भागात विमानाने अगोदरच पोहचणार होते. तर काहींनी इतर देशात पोहचण्याची योजना आखली होती. पण आज सकाळीच सायबर हल्ला झाल्याने देशातील नागरीक आणि पर्यटकांच्या आनंद हिरावला गेला. त्यांना आता नियोजन बदलावे लागले आहे.