वॉशिंग्टन : केंद्र सरकारने लावलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm laws) शेतकऱ्यांच्या (Meena Harris On Farmers Protest) आंदोलनाचा आजचा 70 वा दिवस आहे. शेतकरी (Farmer) हे कायदे सरकारने परत घ्यावे यासाठी दिल्लीच्या सिंघू, टीकरी आणि गाझिपूर बॉर्डरवर ठाण मांडून बसले आहेत. देशभरातील अनेक संघटनांनी या आंदोलनाला समर्थन दिल्यानंतर आता परदेशातूनही शेतकऱ्यांना समर्थन मिळत आहे (Meena Harris On Farmers Protest).
अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांची भाची (Niece) मीना हॅरिसने (Meena Harris) यांनी शेतकऱ्यांच्या प्रदर्शनाबाबत वक्तव्य केलं आहे. एक महिन्यापूर्वी जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर हल्ला करण्यात आला. आता जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर हल्ला होत आहे, असं त्या म्हणाल्या.
मीना हॅरिस (Meena Harris) या न्युयॉर्कच्या कॅपिटल बिल्डिंगमधील (Capitol Building) हिंसेबाबत वक्तव्य केलं. यादरम्यान, भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबतही आपलं मत मांडलं आहे. मीना हॅरिस यांनी अलेक्जेंड्रिया ओकासियो-कोर्टेजबाबत ट्वीट केलं, ‘मी अलेक्जेंड्रिया ओकासियो-कोर्टेजचे आभार मानते, ज्यांनी कॅपिटल विद्रोहादरम्यान अनुभव केलेल्या आघाताबाबत बोलत आहेत, पण मला राग येत आहे की त्यांना अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. आतापर्यंत याचं कुणीही उत्तरदायित्व घेतलेलं नाही. काँग्रेसच्या कुठल्याही सदस्याला निष्काषित करण्यात आलेलं नाही, हे लज्जास्पद आहे.’
It’s no coincidence that the world’s oldest democracy was attacked not even a month ago, and as we speak, the most populous democracy is under assault. This is related. We ALL should be outraged by India’s internet shutdowns and paramilitary violence against farmer protesters. https://t.co/yIvCWYQDD1 pic.twitter.com/DxWWhkemxW
— Meena Harris (@meenaharris) February 2, 2021
मीना हॅरिस यांनी ट्वीट केलं, ‘हा कुठला योगायोग नाही की जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर एक महिन्यापूर्वी हल्ला केला होता आणि आता सर्वात मोठ्या लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. आपल्या सर्वांना भारतमध्ये इंटरनेट शटडाऊन आणि शेतकरी आंदोलकांविरोधात पॅरामिलिट्री हिंसाविरोधात आवाज उठवायला हवा’. (Meena Harris On Farmers Protest)
मीना हॅरिसपूर्वी पॉप स्टार रिहानाने (Rihanna) शेतकरी आंदोलनवर ट्वीट केलं. तिने याबाबतच्या एका बातमीला पोस्ट करत लिहिलं की, ‘आपण याबाबत काही बोलत का नाही #FarmerProtest.’
मीनाक्षी एश्ले हॅरिस (Meenakshi Ashley Harris) एक अमेरिकी वकील आहेत. तसेच, त्या लहान मुलांसाठी पुस्तकं लिहितात, त्या प्रोड्युसर आणि ‘फिनोमिनल वुमन एक्शन कँपेन’च्या संस्थापक आहेत. त्यांना मीना हॅरिसच्या रुपात ओळखलं जातं. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अश्वेत उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्या भाची आहेत. मीना यांची आईचं नाव माया हॅरिस (Maya Harris) आहे. त्या कमला हॅरिस यांच्या बहीण आहेत. त्या व्यवसायाने वकील आणि नीति विशेषज्ज्ञ आहेत.
जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !https://t.co/SaU8nEKlj0@KanganaTeam @rihanna #KanganaRanaut #Rihanna #RihannaSupportsIndianFarmers #RihanaSupportIndianFarmers
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 3, 2021
Meena Harris On Farmers Protest
संबंधित बातम्या :
मोदी सरकारला आव्हान देणारी कोण आहे जगप्रसिद्ध पॉपस्टार मॉडेल रिहाना?