वॉशिंग्टनः अमेरिकेसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जो बायडेन यांनी आज अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. म्हणजेच आजपासून अमेरिकेत बायडेन पर्वाला सुरुवात झाली आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीसुद्धा जो बायडन यांच्यासह उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी सोहळा कॅपिटल हिलमध्ये नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि बराक ओबामा उपस्थित होते. (Know about salary of Joe Biden 46th President of America)
बायडेन आज जगातल्या सर्वात शक्तीशाली राष्ट्राचे प्रमुख झाले आहेत. अनेकांना प्रश्न पडला असेल या सर्वात शक्तीशाली आणि श्रीमंत राष्ट्राच्या प्रमुखांचा पगार किती असेल? त्यांचा पगार ऐकून सर्वांना धक्का बसू शकतो. कारण बायडेन यांना दरवर्षी तब्बल 400000 डॉलर्स (2 कोटी 94 लाख 19 हजार रुपये) वेतन म्हणून मिळणार आहेत. हे वेतन भारताच्या राष्ट्रपतींपेक्षा 5 पटीने जास्त आहे.
अमेरीकन राष्ट्राध्यांना वेतनासह वेगवेगळे तब्बल 17 भत्तेदेखील दिले जातात. त्यांना खर्चासाठी (Expenses) 50000 डॉलर (36 लाख 77 हजार रुपये), प्रवास खर्च म्हणून 100000 डॉलर (73 लाख 54 हजार रुपये) आणि मनोरंजन भत्ता म्हणून 19000 डॉलर (13 लाख 97 हजार रुपये) दिले जातात. यासोबत अजून 14 भत्ते दिले जातात. यासोबतच विद्यमान आणि माजी राष्ट्राध्यक्षांना सुरक्षा आणि आरोग्य विमा, वॉर्डरोब बजेटही दिलं जातं.
डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊस सोडून आलिशान वास्तूत राहायला जाणार
मेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांना व्हाईट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं शासकीय निवासस्थान सोडावं लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आता नेमकं कुठं राहायला जाणार? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे पाम बीचच्या तटावर मार-ए-लागो इस्टेट नावाची एक भव्य वास्तू आहे. तिथेच ट्रम्प राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे ‘न्यूयॉर्क पोस्ट’मध्ये काही लोकांनी ट्रम्प यांच्या सामानाचे ट्रक त्यांच्या मार-ए-लागो या टुमदार घराच्या दिशेला गेल्याचे बघितल्याचं सांगण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या कार्यकाळात मार-ए-लागो येथे बराच वेळ व्यथित केला आहे. त्यामुळे त्यांच्या या घराला ‘व्हिंटर व्हाईट हाऊस’ही म्हटलं जातं. त्यांच्या या वास्तूचं नाव आधी ट्रम्प टॉवर असं होतं. त्यांनी 2019 साली या घराच नाव मार-ए-लागो असं ठेवलं आहे.
संबंधित बातम्या
खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा जो बायडन यांना झटका, सरकारी विमान प्रवास नाकारला
ट्रम्प असाही इतिहास घडवणार. द्विपक्षीय पद्धतच मोडीत काढणार?
(Know about salary of Joe Biden 46th President of America)