वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्रपतीजवळ नेहमी एक (US President) ‘न्यूक्लिअर फुटबॉल’ (Nuclear Football) असतो. जो एका ब्रिफकेस सारखा असतो. याच्या माध्यमातून ते कधीही अणू हल्ला करण्याचा आदेश देऊ शकतात. पण, त्याची देखरेख आणि वापरासोबतच एक मोठी जबाबदारीही येते. अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे असलेला हा ‘न्यूक्लिअर फुटबॉल’ मध्ये विनाशाचं बटण लागलेलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, हे बटण दाबून कधीही अणू हल्ल्याचा आदेश दिला जाऊ शकतो. त्यामुळेच अणू शस्त्रांची चावी मोजक्याच देशांच्या हातात आहे (Nuclear Football).
त्यामुळे याचा चुकीचा वापर होण्याची भीतीही नेहमी असते. ‘न्यूक्लिअर फुटबॉल’चा वापर करत राष्ट्रपती ज्या लोकांना आदेश देतात त्यांना मिनटमन म्हटलं जातं. कारण या लोकांना आदेश मिळाल्याच्या मिनिटांमध्येच मिसाईल लॉन्च करायचा असतो. 2016 नंतर ‘न्यूक्लिअर फुटबॉल’ अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याजवळ होती. नेहमी माजी राष्ट्रपती नवीन राष्ट्रपतीला ही सोपवतात. पण, जेव्हा ट्रम्प राष्ट्रपती जो बायडेन (Joe Biden) यांच्या शपथ ग्रहण समारोहात सहभागी झाले नाही, तेव्हा याबाबत चिंता वाढली होती. पण, आता हे बायडेनला सोपवण्यात आलं आहे.
‘न्यूक्लिअर फुटबॉल’ काळ्या रंगाच्या एका चामड्या ब्रिफकेसमध्ये असतो. हे दिसायला अत्यंत साधारण दिसतं. पण, त्यामध्ये जे उपकरण लागलेलं असतं, ते जगाचा विनाश करु शकतं. या उपकरणांच्या मदतीने अमेरिकेचे राष्ट्रपती जेव्हा वाटेल तेव्हा आपल्या वरिष्ठांच्या सल्लागार आणि इतर लोकांशी कधीही संपर्क साधू शकतात. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अणू मिसाईल आहेत. पण, जर त्यांना लॉन्च करायचं असेल तर त्यासाठी पेंटागनला राष्ट्रपतीची परवानगी घेणं गरजेचं असते.
ब्रिफकेसच्या आत कार्टून बुक सारखा दिसणारं एक पान असतं. यामध्ये ग्राफिक्स असतात. या ग्राफिक्सच्या माध्यमातून युद्धाबाबत काय योजना आहे याची माहिती मिळते. मिसाईल लॉन्च करण्यासाठी कुठले शस्त्र उपलब्ध आहेत आणि कुठे टार्गेट केलं जाऊ शकते, याचीही माहिती मिळते. त्याशिवाय, जर कुठे हल्ला केला तर त्यामध्ये किता लोकांचा मृत्यू होईल याचीही माहिती मिळेल. राष्ट्रपतींवर ही मोठी जबाबदारी असते की त्यांना या सर्व गोष्टी क्षणाभरात समजून घ्याव्या लागतात. म्हणजे हे सर्व समजण्यात थोडाही उशिर झाला तर हे अत्यंत नुकसानदायक ठरु शकतं.
जरी राष्ट्रपतींनी पेंटागन मिसाईलला लॉन्च करण्याचा आदेश दिला तर त्यांचा आदेश तेव्हाच मानला जातो जेव्हा ते त्यांची खास ओळख सांगतात. त्यांची ओळख ही एका अशा कार्डमध्ये असते ज्याला बिस्किट म्हटलं जातं. या कार्डला राष्ट्रपती नेहमी स्वत:जवळ ठेवतात जेणेकरुन ते चुकीच्या हातात जाऊ नये. त्यामुळे असं म्हटलं जात की, राष्ट्रपतीजवळ ते बटण आहे ज्यामुळे विध्वंस होऊ शकतो.
जर राष्ट्रपतींकडून आदेश मिळतोआणि ते त्यांची खास ओळख सांगण्यात यशस्वी होतात. तर काहीच मिनिटांमध्ये मिसाईल लॉन्च केली जाऊ शकतात (Nuclear Football).
मिनटमनला आपल्या सहकाऱ्यांच्यासोबत एका कंम्प्युटरची देखरेख करावी लागते. ज्यावर राष्ट्रपती कुठल्याही क्षणी मिसाईल लॉन्च करण्याचे आदेश देऊ शकतात. अमेरिकेत फक्त राष्ट्रपतीच अणू हल्ला करण्याचा आदेश देऊ शकतात. त्यामुळेच ही ब्रिफकेस नेहमी राष्ट्रपतीजवळ असते आणि याचा चुकीचा वापर केला जाऊ नये म्हणून राष्ट्रपतीसोबत नेहमी काही खास लोक असतात. पण, राष्ट्रपतींना दोका पत्करुनच आदेश द्यावे लागतात. जर ते असं करतात, तर जॉईंट कमिटीचे चीफ ऑफ स्टाफ हा आदेश मान्या करण्यास नकार देऊ शकतात.
अशा प्रकारच्या स्थितीपासून वाचण्यासाठी आदेश माणणाऱ्या लोकांना खास प्रशिक्षण दिलं जातं. जेणेकरुन याचा कधीही चुकीचा वापर होऊ नये. पण, जर संकटसमयी राष्ट्रपती आदेश देतील तर त्याला रोखणं मुश्किल असतं.
बायडन यांच्या एका निर्णयामुळे भारतीय IT व्यावसायिकांना होणार फायदा, प्रत्येक वर्षी देणार 80,000 व्हिसाhttps://t.co/3sx4lWUgVQ#America #JoeBiden #JoeBidenInauguration
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 21, 2021
Nuclear Football
संबंधित बातम्या :
व्लादीमिर पुतिनचा 100 अब्ज डॉलरचा रहस्यमय बंगला, फोटो व्हायरल करणाऱ्याच्या जीवाला धोका का?
ड्रॅगनचा पलटवार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह 27 जणांवर बंदी, चीनविरोधी धोरणाचा ठपका
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आता ‘एवढा’ पगार घेणार
ऐतिहासिक! जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ