प्रिन्स फिलिप-एक असे राजकुमार जे स्वत:च्या मुलांना स्वत:चे नावही लाऊ शकले नाहीत

| Updated on: Apr 10, 2021 | 1:26 AM

ब्रिटनचे प्रिंस आणि ड्यूक ऑफ एडिनबरा प्रिंस फिलिप यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या चढउतारांचा आढावा.

प्रिन्स फिलिप-एक असे राजकुमार जे स्वत:च्या मुलांना स्वत:चे नावही लाऊ शकले नाहीत
Britain Prince Philip (PTI)
Follow us on

लंडन : जगातील सर्वात मोठ्या राजघराण्यासाठी आजचा (9 एप्रिल 2021) दिवस दुखद आहे. ब्रिटनची राणी एलिझाबेथचे (द्वितीय) पती आणि ड्यूक ऑफ एडिनबरा प्रिंस फिलिप यांचं निधन झालंय. भारतीय वेळेनुसार सायंकाळच्या वेळी ब्रिटनच्या राजघराण्याने त्यांच्या निधनाची घोषणा केली. यानंतर ब्रिटनसह जगभरातून दुःख व्यक्त करण्यात आलं. याच निमित्ताने फिलिफ यांच्या आयुष्यभराच्या प्रवासाविषयी हा आढावा (Know why Britain Prince could not give his name to son Charles) .

प्रिंस फिलिप आणि महाराणी एलिझाबेध यांचं लग्न भारत स्वातंत्र्याची तयार करत असताना म्हणजेच 1946 मध्ये झालं. त्यांचं लग्न झालं तेव्हा ब्रिटनचे राजा किंग जॉर्ज तेव्हा जीवंत होते. त्यामुळे एलिझाबेथवर तसा कोणताही दबाव नव्हता. त्यामुळे दोघांनाही सुरुवातील राजेशाही जगण्याबाबत काही स्वारस्य नसल्याचं दिसलं. उलट प्रिंस फिलिप राजघराण्याच्या अतिनियमांवर नाराज होते. मात्र, 5 वर्षांनंतर हे सर्व काही बदललं. 1952 मध्ये किंग जॉर्ज यांचं निधन झालं आणि परंपरेप्रमाणे वारस म्हणून त्यांची सर्वात मोठी मुलगी एलिझाबेथकडे पदभार आला. त्यानंतर 25 वर्षीय एलिझाबेथचं आयुष्यच बदलून गेलं. सर्व जगाची नजर तिच्यावर होती. तिच्यावर जगातील सर्वात मोठ्या राजघराण्याची परंपरा पुढे चालवण्याची जबाबदारी होती.

मुलाला आपलं नाव देण्याची फिलिप यांची इच्छा अपूर्ण

प्रिंस फिलिप हे ग्रीसच्या राजघराण्यातील सदस्य होते. फिलिप आणि एलिझाबेथ यांना पहिला मुलगा झाला. त्याचं नाव प्रिंस चार्ल्स. त्यावेळी चार्ल्सला आपल्या वंशाचं नाव द्यावं अशी फिलिप यांची इच्छा होती. म्हणजेच चार्ल्सला माऊंटबॅटन हे आडनाव देण्याची त्यांची इच्छ होती. मात्र, त्यांनी अनेक प्रयत्न करुनही त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. राणी एलिझाबेथ यांनी 1952 मध्ये आपल्या मुलांना राणीच्या वंशाचं म्हणजेच विंडसर हे आडनाव देण्याबाबत आदेश दिले.

राणीच्या आदेशाचं शल्य फिलिप यांच्या आयुष्यभरात कायम दिसलं. एका टीव्ही मुलाखतीतही त्यांनी हे बोलून दाखवलं. त्यात ते म्हणाले की संपूर्ण ब्रिटनमध्ये आपल्या मुलाला स्वतःचं नाव देऊ न शकणारा मी एकमेव बाप असेल. असं असलं तरी प्रिंस हॅरीने मात्र त्यांची ही इच्छा पूर्ण केली. प्रिंस हॅरी आणि मेगन मर्केल यांनी आपल्या मुलाचं नाव आर्ची माऊंटबॅटन विंडसर असं ठेवलं.

हेही वाचा :

“मुलाचा रंग काळा असेल या भितीने ब्रिटनच्या राजघराण्याने ‘प्रिन्स’ उपाधी दिली नाही”, मेगन मर्केल यांचा मोठा गौप्यस्फोट

ब्रिटनहून आलेल्या 58 प्रवाशांना नवा कोरोना, महाराष्ट्रातील 8 जणांना संसर्ग

Special Story : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार, किती धोकादायक, आता पुढे काय?

व्हिडीओ पाहा :

Know why Britain Prince could not give his name to son Charles