मुंबई : ब्रिटनमधली (Britain) ताजपोशी, राजमुकुटाचा विषय निघाली की कोहिनूरची चर्चा होतेच. ब्रिटनच्या रॉयल घराण्याच्या राजजेशाही मुकुटामध्ये जडला आहे कोहिनूर हिरा. या कोहिनूर हिऱ्याचा थेट भारताशी संबध आहे. भारताच्या भीतीनेचे हा कोहिनूर लपवून ठेवण्यात आला आहे. यामुळेच ब्रिटनच्या रॉयल फॅमिलीने आता मोठा निर्णय घेतला आहे.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राजा चार्ल्स तिसरा यांचा राज्याभिषेक होणार आहे. पुढील वर्षी म्हणजेच 6 मे रोजी वेस्टमिन्स्टर ऍबे येथे हा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे .
या राज्याभिषेक सोहळ्यात किंग चार्ल्स-3 यांच्या पत्नी कॅमिला पार्कर यांचाही राज्याभिषेक होणार आहे. या सोहळ्यात कॅमिला पार्कर यांना या मुकुट घातला जाणार असल्याची चर्चा आहे.
ब्रिटीश राजघराण्याला भारताच्या नाराजीची भीती. कोहिनूरचा वाद टाळण्यासाठी राजघराण्याने मोठा निर्णय घेतला आहे. कॅमिला पार्कर यांना हा मुकुट घातला जाणार नाही.
105 कॅरेटचा कोहिनूर हिरा या राजेशाही मुकुटाची शान वाढवत आहे. भारतात हजारो वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातल्या खाणीत हा हिरा सापडला होता. अनेक सम्राटांनी आपापल्या शक्तीच्या बळावर तो आपल्या राज्यात नेला. एकाकडून दुसऱ्याकडे हजारो राजांनी तो बळकावला.
जगभरात फिरून तो भारतातही आला. पण अखेरच्या करारानुसार ब्रिटिशांकडे गेला आणि त्यानंतर तिथून तो कुणालाही अद्याप सोडवता आलेला नाही.
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं निधनानंतर कोहिनूर परत भारतात आणण्याची मागणी होऊ लागली आहे.