दक्षिण कोरियामध्ये रविवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली.181 प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाचा मुआन इंटरनॅशनल एअरपोर्टवर मोठा अपघात झाला. हे विमान रन वे वरून घसरलं त्यानंतर बाउंड्री फेसला जाऊन धडकलं. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली.या अपघातामध्ये 179 लोकांचा मृत्यू झाला, तर फक्त दोनच लोकांचा जीव वाचला.
या अपघाताची माहिती मिळताच प्रवाशांच्या नातेवाईकांनी एअरपोर्टवर गर्दी केली. आपल्या प्रियजनांचा मृतदेह शोधताना हे नातेवाईक दिसत आहेत.या विमानामध्ये असा देखील एक प्रवासी होता, ज्याला आपल्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती. त्याने अपघातापूर्वी विमानातूनच एक मेसेज केला होता.जो मेसेज वाचून त्याच्या नातेवाईकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.त्यानंतर त्यांनी तातडीनं विमानतळ गाठलं.
मेसेजमध्ये काय लिहीलं होतं?
या प्रवाशाचा शोध घेत एअरपोर्टवर पोहोचलेल्या कुटुंबानं म्हटलं की,अपघाताच्या काही मिनिटं आधीच विमानामध्ये असलेल्या व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला मेसेज केला होता. ज्यामध्ये त्याने लिहीलं होतं की एक पक्षी विमानाच्या पंखामध्ये अडकला आहे.त्यामुळे आता आम्हाला विमानाचं सेफली लँडिंग करता येणार नाही. तेव्हा त्याला विचारण्यात आलं की ही घटना कधी घडली तर त्याने सांगितलं की एक मिनिटांपूर्वीच हा पक्षी विमानाच्या पात्यात अडकला आहे. आता मी माझं वारस पत्र लिहू का? असं या विमानात अडकलेल्या व्यक्तीनं पुन्हा मॅसेज पाठवल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत द कोरिया टाइम्सनं वृत्त दिलं आहे.
दरम्यान या अपघाताचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये हे विमान रन वे वर उतरताना घसरल्याचं आणि नंतर धडकल्याचं दिसून येत आहे.त्यानंतर या विमानाला भीषण आग लागली. या अपघातामध्ये 179 प्रवाशांचा मृत्यू झाला.
दरम्यान या अपघातापूर्वी काही वेळ आधीच या व्यक्तीने आपल्या नातेवाईकांना हा मेसेज केला होता. त्यात त्याने हे देखील म्हटलं होतं की मी आता माझं वारस पत्र बनवतो. हा मेसेज वाचल्यानंतर सर्वांनाच आशर्चयाचा धक्का बसला आहे.