नवी दिल्लीः ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यापूर्वी, आणि पदावरुन पायउतार होण्यापूर्वी ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान लिझ ट्रस (liz truss) यांनी मंगळवारी 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी आपल्या निरोपाच्या भाषणात नवीन पंतप्रधान ऋषी सुनक यांना त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी आणि प्रत्येक यशासाठी शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, सध्या आम्ही अनेक संकटांशी सामना करत आहोत, पण या संकटातून आम्ही बाहेर पडू त्यामुळे ब्रिटनवर माझा विश्वास आहे.
रशिया-युक्रेन युद्धावर बोलताना लिझ ट्रस या म्हणाल्या की, पुतीन यांच्या आक्रमकतेविरुद्ध धैर्याने लढण्यासाठी आपण युक्रेनला पाठिंबा दिला पाहिजे.
London, UK | Outgoing PM Liz Truss gives statement outside Downing Street
Our country continues to battle through a storm. I believe in Britain and the British people and I know that brighter days lie ahead: Outgoing PM Liz Truss
(Pic source: Reuters) pic.twitter.com/n5XPuDgMJO
— ANI (@ANI) October 25, 2022
युक्रेनला आपण मजबूज करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि आपण आपल्या देशाची सुरक्षाही मजबूत केली पाहिजे असंही त्या म्हणाल्या.
माझ्या कार्यकाळात मी हेच साध्य करण्याचा प्रयत्न केला मात्र आता ऋषी सुनकही ब्रिटनच्या भल्यासाठी प्रयत्न करतील अशी त्यांनी भावनाही व्यक्त केली.
लिझ ट्रस यांनी आपला राजीनामा सुपूर्द करणार असून आता त्यानंतर 42 वर्षीय ऋषी सुनक ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त होणार आहेत.
त्यानंतर 10 डाउनिंग स्ट्रीट येथे सुनक पंतप्रधान म्हणून पहिले भाषण देणार आहेत. ज्यामध्ये त्यांची पत्नी अक्षता मूर्ती आणि मुली कृष्णा आणि अनुष्का उपस्थित राहणार आहेत.
ऋषी सुनक यांनी सोमवारी निवड झालेले पंतप्रधान या नात्याने त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात सांगितले की, ब्रिटन हा एक महान देश आहे.
मात्र या काळात आपण एका गंभीर आर्थिक आव्हानांचाही सामना करत असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या यशस्वी वाटचालीसाठी ते म्हणाले की, आता आपल्याला स्थिरता आणि एकता पाहिजे आहे. आणि ती आपण लवकरच पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.