प्रेमात गद्दारीचा संशय ! डेटींग ऐप्‍सने पार्टनरवर पाळत ठेवण्यात या शहरातील महिला सर्वात पुढे

| Updated on: Mar 23, 2025 | 8:59 PM

सोशल मीडिया आणि डेटींग एप्सच्या मदतीने मदतीने लोक एकमेकांना सहज धोका देत आहेत. पार्टनरनी एकमेकांशी बोलण्याऐवजी ते त्यांची हेरगिरी करण्याच्या मागे लागले आहेत.

प्रेमात गद्दारीचा संशय ! डेटींग ऐप्‍सने पार्टनरवर पाळत ठेवण्यात या शहरातील महिला सर्वात पुढे
Follow us on

ऑनलाईन प्रेम शोधण्याचा प्रकार काही आता नवा राहीलेला नाही. जगभरात डेटींग एप्सचा त्यासाठी वापर होत आहे. आपल्यासाठी परफेक्ट पार्टनर शोधण्याचे काम डेटींग एप्सद्वारे तरुण आणि तरुणी सातत्याने करीत असतात. परंतू या डेटींग एप्सचा वापर आता आपल्या जोडीदारावर पाळत ठेवण्यासाठी करत असेल तर तुम्ही याला काय म्हणाल ?

प्रेमात ज्यांना धोका मिळण्याची भीती आहेत अशा लोकांनी आता हायफाय टेक्नॉलॉजीचा वापर सुरु केला आहे. कारण लोकांचा आता माणसांपेक्षा टेक्नॉलॉजीवर जास्त विश्वास निर्माण होत आहे. येथे महिला किंवा तरुणींना आपले पार्टनर दिवसभर काय करीत आहेत.आणि आपल्या शिवाय आणखीन कोणाला भेटत आहेत याची इत्यंभूत माहीती टेक्नॉलॉजीमुळे मोबाईलवरच मिळणे सोपे झाले आहे.

एका वृत्तपत्रात CheatEye.ai च्या बातमीत हा उल्लेख केलेला आहे. यातील बातमीनुसार लंडन शहरातील महिलाना टींडर सारख्या डेटींग एप्सचा वापर आपल्या जोडीदारावर पाळत ठेवण्यासाठी करीत आहेत. कारण त्यांना त्यांचा पार्टनरच्या इमानदारीवर संशय आहे. एका सर्वेत असे उघड झाले की नवीन पिढीत विश्वासार्हता कमी होत चालली आहे. टींडरवर २७.४ टक्के सर्च पार्टनरवर नजर ठेवण्यासाठी आणि तो किती बेवफा असू शकतो या संदर्भात झाला आहे. लंडनच नाही तर युकेमधील इतर शहरे मॅनचेस्टर, बर्मिंघम आणि ग्लासको या शहरात देखील हाच ट्रेंड पाहायला मिळाला आहे. नात्यात मोठ्या प्रमाणात धोका मिळण्याची भीती तरुण आणि जादा करुन तरुणींना सतावत आहे.

हे सुद्धा वाचा

६९ सर्च पार्टनरवर नजर ठेवण्यासाठीच

लंडननंतर दुसऱ्या क्रमांकावर मॅनचेस्टर शहर आहे. येथे ८.८ टक्के टिंडर सर्च दगाबाजी संदर्भातील आहेत. बर्मिंघममध्ये ८.३ टक्के सर्च याच कामासाठी झाले आहेत. सर्वेत म्हटले आहे की मोठ्या संख्येने महिला आपल्या पार्टनरवर ऑनलाईन पाळत ठेवून आहेत. पार्टनरला गमावू या भीती पोटी हे सर्चिंग सुरु आहे. यामुळे उलट असुरक्षा वाढून तणाव वाढत आहे.