नशिबाची ‘कम्माल’… ५३ वर्षांनी सापडले हरवलेले पाकिट

| Updated on: Feb 07, 2021 | 3:24 PM

नशिबाची 'कम्माल'... ५३ वर्षांनी सापडले हरवलेले पाकिट(Lost wallet found after 53 years)

नशिबाची कम्माल... ५३ वर्षांनी सापडले हरवलेले पाकिट
५३ वर्षांनी सापडले हरवलेले पाकिट
Follow us on

वॉशिंग्टन : कोणाच्या नशिबाचे दरवाजे कधी उघडतील, ते सांगता येत नाही. कधी कुणाला अचानक लॉटरी लागते, तर कधी कुणाला दुरावलेली प्रिय व्यक्ती अचानक भेटते. असाच एक चमत्कार तब्बल ५३ वर्षांनी घडला. अमेरिकेतील एका व्यक्तीचे तारुण्यात हरवलेले पाकिट ५३ वर्षांनंतर म्हणजेच ती व्यक्ती आजोबा बनल्यानंतर सापडले. यातून त्या व्यक्तीला लॉटरी लागल्यापेक्षाही प्रचंड आनंद झाला. अंटार्टिकामध्ये हरवलेले पाकिट पुन्हा अमेरिकेत येऊन हाती लागल्यानंतरचा आजोबांचा आनंद गगनात मावणारा नव्हता. पॉल ग्रिशम यांनी हा नशिबाचा ‘कम्माल’ अनुभव घेतला.(Lost wallet found after 53 years)

काय होती ग्रिशम यांची प्रतिक्रिया?

जेव्हा त्यांना शनिवारी पाकिट परत करण्यात आले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हे पाकिट माझ्यापर्यंत पोहटवण्यासाठी अनेक लोकांनी एकमेकांशी संपर्क साधला. त्यानंतर माझे पाकिट परत मिळाले. या पाकिटात ग्रिशम यांचे नेव्हीचे ओळखपत्र, वाहन परवाना, पॉकेट रेफरन्स कार्ड, बियर राशन पंच कार्ड, कर भरणा केल्याची पावती आणि पत्नीला पाठवलेल्या मनी ऑर्डरची पावती आहे.(Lost wallet found after 53 years)

खास मिशनवर गेले होते अंटार्टिकाला

एरिजोना येथील डगलसमध्ये ग्रिशम यांचे बालपण गेले. त्यानंतर 1948 साली ग्रिशम नौसेनेत भरती झाले. वर्ष 1967 मध्ये त्यांना ऑपरेशन डीप फ्रीज मोहिमेसाठी अंटार्टिका येथे पाठविण्यात आले होते. या मोहिमेचा हेतू वैज्ञानिकांना मदत करणे हा होता. त्यावेळी त्यांचे वय 30 वर्षे होते. त्यांना पत्नी, दोन मुले असा परिवार होता. अंटार्टिकामध्ये ते बिलकुल खूश नव्हते.

अशा प्रकारे ग्रिशम यांच्याकडे पोहचले पाकिट

अंटार्टिकामध्ये असताना ग्रिशम यांचे हे पाकिट हरवले होते. ग्रिशम ही बाब विसरुनही गेले होते. हे पाकिट 2014 मध्ये रॉस द्विप(Ross Island)वर मॅकमुर्डो स्टेशनजवळ एका इमारतीच्या तोडकाम करताना एका लॉकरमागे सापडले. खऱ्या मालकापर्यंत पाकिट पोहचवण्यासाठी अनेक लोकांना डझनभर ई-मेल्स, फेसबुक मॅसेज आणि पत्र पाठवण्यात आले. स्टीफन डेकाटो आणि त्यांची मुलगी सारा लिंडबर्ग आणि इंडियाना स्पिरिट ऑफ ’45 नॉन प्रॉफिट फाउंडेशनचे ब्रायन मॅक्की यांनी याआधीही एका नौसैनिकाचे ब्रेसलेट त्याच्यापर्यंत पोहचवले होते. त्यामुळे त्यांच्याकडे हे पाकिट परत देण्याचे काम सोपवण्यात आले. अशा प्रकारे हे पाकिट ग्रिशम यांच्यापर्यंत पोहचले.(Lost wallet found after 53 years)

 

 

इतर बातम्या

महापुरामुळे विनाश घडवणारा हिमकडा म्हणजे काय? उत्तराखंडापासून हरिद्वारपर्यंत अलर्ट कशासाठी?

रिषभ पंत-चेतेश्वर पुजाराची पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी

 

(Lost wallet found after 53 years)