बाहेर उभी आहे, आत तर घ्या… दोन वर्षापूर्वी मेलेल्या बायकोचा डेटिंग अ‍ॅपवर मेसेज, नवरा कोमात; असं कसं घडलं?

| Updated on: Jan 15, 2025 | 2:05 PM

लंडनमधील डेरेक नावाच्या व्यक्तीला त्याच्या दोन वर्षांपूर्वी कॅन्सरने मृत्यू पावलेल्या पत्नी एलिसनचा टिंडरवर संदेश आला. सुरुवातीला फोटो पाहून धक्का बसला, त्यानंतर पहाटे 3.33 वाजता "Hey" असा संदेश आणि नंतर घरी येण्याची विनंती! डेरेक घाबरला, माफी मागितली आणि नंतर एलिसनचे अकाउंट गायब झाले. ही घटना त्याने घोस्ट हंट पॉडकास्टवर शेअर केली आहे.

बाहेर उभी आहे, आत तर घ्या... दोन वर्षापूर्वी मेलेल्या बायकोचा डेटिंग अ‍ॅपवर मेसेज, नवरा कोमात; असं कसं घडलं?
मेलेल्या बायकोने उडवली झोप
Follow us on

एखादी व्यक्ती एकदा मेल्यावर पुन्हा दोन वर्षांनी जिवंत होऊ शकते? मृत व्यक्ती डेटिंग अ‍ॅपवर आपल्या कुटुंबियाशी चर्चा करू शकतो? तुम्हाला या प्रश्नांनी चक्रावलं असेल आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही नाही म्हणूनच द्याल. पण यूकेमधील एका व्यक्तीने डोकं सुन्नं करणारा एक दावा केला आहे. डेटिंग अ‍ॅप टिंडरवर त्याला त्याच्या बायकोचा मेसेज आला होता. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी त्याच्या बायकोचं कॅन्सरने निधन झालं होतं. बायकोचं निधन झाल्याने तो प्रचंड दुखात होता. या दु:खातून सावरण्यासाठीच त्याने आपली गोष्ट घोस्ट हंट पॉडकास्टवर त्याने शेअर केली. त्याचीही आपबिती सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे.

ब्रिटनच्या लंडनमध्ये राहणाऱ्या डेरेकच्या बायकोचं नाव एलिसन होतं. तिला सर्व्हाइकल कॅन्सर होता. त्यामुळे तिचा दोन वर्षापूर्वी मृत्यू झाला. एकेदिवशी टिंडरवर तिची प्रोफाईल पाहून मला धक्का बसल्याचं डेरेकने सांगितलं. त्या प्रोफाईलमध्ये अधिक माहिती नव्हती. पण त्याने कधीच पाहिले नव्हते असे तीन फोटो होते. या फोटोत एलिसन हसत होती. हे फोटो पाहून डेरेक प्रचंड घाबरला. तो इतका घाबरला की तो तीन दिवस झोपलाच नाही. त्यानंतर त्याने स्वत:लाच सावरण्याचा प्रयत्न केला. कुणी तरी बनावट अकाऊंट करून आपल्याशी मस्करी केली असावी अशी त्याने स्वत:चीच समजूत काढली.

बायकोचं भूत बेडरूमपर्यंत

हे सुद्धा वाचा

डेरेकने पुढची गोष्ट सांगितली ती हादरून सोडणारीच आहे. एके दिवशी पहाटे 3.33 वाजता टिंडरवर त्याची पत्नी एलिसनचा मेसेज आला. Hey। असं तिने लिहिलेलं होतं. त्यावर डेरेकने विचारलं, माझ्या बायकोचा फोटो कुठून मिळाला? त्यावर पुढच्या 24 तासात एकही मेसेज आला नाही. त्यानंतर पुन्हा एक मेसेज आला. आता एलिसनने थेट विचारणा केली. तुम्ही घरी आहात का? असं तिने मेसेज करून विचारलं. मी बाहेर उभी आहे. मला आत घ्या, असंही या मेसेजमध्ये म्हटलं होतं. हा मेसेज पाहून डेरेक घाबरला. तो घाबरूनच बेडवर जाऊन झोपला. या मेसेजमध्ये तिने माझा डेरी म्हणून उल्लेख केला होता. फक्त तिच मला डेरी म्हणायची. कुणालाही माझं नाव डेरी आहे, हे माहीत नव्हतं, असा दावाही त्याने केला.

माफी मागितल्यावर गेली

डेरेक म्हणतो, थोड्यावेळाने बेडरूममध्ये कुणी तरी आल्याची जाणीव झाली. त्यावेळी मी प्रचंड घाबरलो. मी मेसेज केला की मला माफ कर. मी तुझ्यावर निरातिशय प्रेम करतो. तुला जाऊन दोन वर्ष झालीत. तुझी खूप आठवण येते. मला आता पुढे जायचं आहे, असं मी या मेसेजमध्ये म्हटलं. त्यानंतर बेडरूममधून कोणी तरी बाहेर गेल्याचं मला जाणवलं. थोड्यावेळाने टिंडरवरून एलिसनचं अकाऊंटही गायब झालं. हे कसं झालं. याची मला काहीच गंधवार्ता नाही, असंही तो म्हणाला.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)