मानवाधिकाराचे ज्ञान झाडणाऱ्या अमेरिकेवर भारताचा पलटवार, जयशंकर म्हणाले- इंडिया नाम सुनकर फ्लावर समझे क्या, फायर है मैं

| Updated on: Apr 14, 2022 | 2:09 PM

वॉशिंग्टन : अमेरिकेने मानवी हक्कांच्या मुद्द्यावरून भारताला लक्ष केले होते. तसेच भारतातील मानवी हक्कांच्या (Human Rights) बाबतीत आपण चिंतित आहोत, असे म्हटले होते. अमेरिका भारत सरकार, पोलिस आणि जेलअधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानवधीकारांच्या उलंघनावर नजर ठेऊन असल्याचेही म्हटले होते. याबाबत वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन (US Secretary of State Antony Blinken) यांनी केले होते. त्यानंतर आतरराष्ट्रीय […]

मानवाधिकाराचे ज्ञान झाडणाऱ्या अमेरिकेवर भारताचा पलटवार, जयशंकर म्हणाले- इंडिया नाम सुनकर फ्लावर समझे क्या, फायर है मैं
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
Image Credit source: TV9
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेने मानवी हक्कांच्या मुद्द्यावरून भारताला लक्ष केले होते. तसेच भारतातील मानवी हक्कांच्या (Human Rights) बाबतीत आपण चिंतित आहोत, असे म्हटले होते. अमेरिका भारत सरकार, पोलिस आणि जेलअधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानवधीकारांच्या उलंघनावर नजर ठेऊन असल्याचेही म्हटले होते. याबाबत वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन (US Secretary of State Antony Blinken) यांनी केले होते. त्यानंतर आतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्कांवरून भारताला अनेक प्रश्न विचारले जात होते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्कांच्या मुद्द्यावरून भारत चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर आता प्रश्न उपस्थित करणाऱ्या अमेरिकेला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (MEA S. Jaishankar) यांनी स्पष्ट शब्दात अमेरिकेला प्रत्युत्तर देत खडेबोल सुनावले आहेत. भारतातील मानवी हक्कांवर अमेरिकेने (America) केलेल्या टीकेला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, भारत अमेरिकेसह इतर देशांच्या मानवाधिकार परिस्थितीवरही लक्ष ठेवून आहे. दिल्लीलाही अमेरिकेसह इतर देशांची चिंता आहे. त्यावर आता सोशल मिडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली आहे. तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची स्तुती होताना दिसत आहे. अमेरिकेला त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे त्यांना देशातील लोक त्यांना सॅल्युट करत आहेत. तर ट्विटरवर त्यांच्या फोटोवर पुष्पा चित्रपटातील काही डायलॉग ही टाकले जात आहेत. त्याली प्रसिद्ध असा पुष्पा नाम सुनकर फ्लावर समझे क्या, फायर है मैं… याचा ही समावेश आहे. तर येथे जयशंकर यांच्यासाठी इंडिया नाम सुनकर फ्लावर समझे क्या, फायर है मैं असे लिहलेले आहे.

आम्ही गप्प बसणार नाही

यावेळी भारतातील मानवी हक्कांवर अमेरिकेने केलेल्या टीकेला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, लोकांना भारताबद्दल मत मांडण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर आम्हालाही त्यांच्या विचांरावर, मतांवर आमतचे मत मांडू शकतो. त्यामुळे ज्यावेळी भारतातील मानवी हक्क सारख्या विषयावर बोलले जाईल तेव्हा आम्ही गप्प बसणार नाही. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी जयशंकर यांच्या उपस्थितीत अमेरिका भारत सरकार, पोलिस आणि जेलअधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानवधीकारांच्या उलंघनावर नजर ठेऊन असल्याचे म्हटले होते. तसेच भारतातील सरकारे, पोलिस आणि जेलअधिकाऱ्यांकडून मानवधीकारांच्या उलंघन केले जात आहे.

दोन सिखांवर हल्ला

ज्यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन हे आपले ज्ञान जयशंकर यांच्या उपस्थितीत झाडत होते त्याचवेळी न्यूयॉर्कमध्ये दोन सिखांवर हल्ला झाला होता. त्यानंतर आता भारतातील मानवाधिकारांवर अमेरिकेने केलेल्या टीकेला जयशंकर यांनी जोरदार उत्तर दिल्यानंतर देशातील लोक त्यांना सॅल्युट करत आहेत.

इतर बातम्या :

Inquiry against former prime minister Imran Khan : माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अडचणी वाढणार? ‘त्या’ नेकलसवरून होणार चौकशी

सातवीत असताना गरदोर, 14 व्या वर्षी बनली आई! आता स्वतःच मुलीला सांगितला गरोदर होण्यामागचा किस्सा

new york brooklyn shooting : अमेरिकेतील ब्रुकलीन स्टेशनवर हल्ला, संशयास्पद फोटो आला समोर, काय आहे त्या फोटोमध्ये?