Putin-Kim Jong : ज्याची भीती तेच घडले! पुतीन आणि किम जोंग यांच्या भेटीने जगभरात धुराळा

| Updated on: Sep 13, 2023 | 3:49 PM

Putin-Kim Jong : रशिया आणि उत्तर कोरियाची वाढती जवळीक अमेरिकेसह नाटोसाठी धोक्याची घंटा आहे. किम जोंग उन आणि व्लादिमीर पुतीन या दोघांच्या भेटीने आशियाच नाही तर युरोप, अमेरिकेपर्यंत अनेक देशांना थेट संदेश गेला आहे. सध्या युक्रेनविरोधातील लढाईत उत्तर कोरियाने रशियाची पाठराखण केली आहे. अशी समीकरणं बदलली आहेत.

Putin-Kim Jong : ज्याची भीती तेच घडले! पुतीन आणि किम जोंग यांच्या भेटीने जगभरात धुराळा
Follow us on

नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : जे घडण्याची भीती संपूर्ण जगाला होती, अखेर ती मुलाखात एकदाची झालीच. रशियाच्या व्लादिवोस्तक या ठिकाणी राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin)आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन ( Kim Jong un) या दोघांची भेट झाली. या भेटीची छायाचित्र, चलचित्र अवघ्या जगात लागलीच व्हायरल झाली. त्याचे पडसाद संपूर्ण जगात पडले. या भेटीची सर्वाधिक धास्ती अमेरिकेसह नाटो राष्ट्रांनी (UN-NATO) होती. ही भेट या राष्ट्रांसाठी धोक्याची घंटाच आहे. पुतीन यांनी किम जोंगच्या आदरतिथ्यात कुठलीच कमी भासू दिली नाही. हा पाहुणचार अवघ्या जगाने अनुभवला. या भेटीतून आशियासह युरोप आणि अमेरिकेपर्यंत जो संदेश द्यायाचा होता, तो पोहचला. या भेटीने जग कोणत्या दिशेने सरकत पुढ चालले आहे, ते चित्र स्पष्ट होत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

या करारावर सहमती

तज्ज्ञांच्या मते, दोन्ही देशांमध्ये शस्त्रांच्या व्यवहारावर सहमती झाली. या मॅरेथॉन बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. या मुलाखती दरम्यान रशिया उत्तर कोरियाला सॅटेलाईट तयार करण्यासाठी मदत करणार असल्याचे भाकित खरे ठरले. तर मॉस्कोवर कोणतेही युद्धाचे ढग आले तर दक्षिण कोरिया रशियाच्या बाजूने मैदानात उतरण्याची ग्वाही देण्यात आली. उत्तर कोरियाला होणारी ही मदत पूर्वेतील राष्ट्रांना पण अस्वस्थ करणारी आहे. एकाच बिंदूतील रशिया, चीन आणि उत्तर कोरियाच्या हातमिळविणीने अमेरिका चिंतेत सापडली आहे.

हे सुद्धा वाचा

ही शस्त्रांस्त्रे देणार

दोन्ही नेत्यांमध्ये आर्टिलेरी शेल्स आणि एंटीटँक मिसाईल यासह इतर शस्त्रांस्त्रे देण्याविषयी चर्चा झाली. पुतीन यांनी किमला त्यांच्या अंतराळ संस्थेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. किम आणि पुतीन यांची ही जवळीकता अनेक देशांना खटकत आहे. लोकशाहीवादी देशांना त्यापासून धोका असल्याचा तज्ज्ञांचा सूर आहे. या भेटीदरम्यान किमची बहिण पण उपस्थित होती.

अमेरिकेसह नोटा चिंतेत

या भेटीने अमेरिकेसह नोटा देशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात उत्तर कोरियाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पृथ्वीतलावरील हा देश जागतिक घडामोडींपासून अलिप्त आहे. एकाधिकारशाहीमुळे येथील कोणतीच वार्ता जगासमोर येत नाही. चीन हा तेवढाच या देशाला जगाच्या पाठीवर शेजारी होता. आता त्याने रशिया केलेली युती अनेक राष्ट्रांना धक्का देणारी आहे. खासकरुन अमेरिका आणि नाटो देशांसाठी हा धक्का आहे. याविरोधात लवकरच ते प्रतिक्रिया देतील असे भाकीत वर्तविण्यात येत आहे.


उत्तर कोरियाला मिळाला नवीन मित्र

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, अमेरिका युक्रेनचा वापर करुन रशियाला जेरीस आणत आहे. त्याचवेळी रशियाने भात्त्यातील अस्त्र बाहेर काढले आहे. पुतीन आता अमेरिकेला जेरीस आणण्यासाठी किमचा वापर करणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण किमचे भूत बाटली बाहेर निघाल्यास जपानसह दक्षिण कोरिया, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया या देशांसह अमेरिकेला मोठा धोका निर्माण होण्याचा दावा करण्यात येत आहे. युक्रेनच्या युद्धात उत्तर कोरियाच्या शस्त्रांचा वापर होण्याची भीती आहे. तसेच या युद्धात किम त्याचे सैनिकही दिमतीला लावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.