Mexico air force plane crashed : मेक्सिकोमधील वेराक्रूज राज्यात सैन्याचं विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या घटनेत 6 जवानांचा मृत्यू झाला आहे. मेक्सिकोच्या संरक्षण मंत्र्यांनी रविवारी याविषयी माहिती दिली. रविवारी (21 फेब्रुवारी) ही घटना घडली. मेक्सिकोच्या हवाई दलाचे विमान लियरजेट 45 जालपा शहरातून उड्डाण करत होते. विमान दुर्घटनाग्रस्त होण्याचं कारण सांगण्यात आलेले नाही. (Mexico air force plane crashed six people died)
अपघातग्रस्त विमानात किती जण प्रवास करत होते त्याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून चौकशी सुरु आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विमानानं उड्डाण केल्यानंतर विमानाल आग लागली आणि दूर्घटना झाली. रविवारी सकाळी 9.45 वाजता ही घटना घडली. लियरजेट विमान जलापा शहराजवळील एमिलियाने जपाटा येथील एल लेंसेरो विमानतळावरुन उड्डाण घेत होते.
कॉकपिटची खिडकी तोडण्याचा प्रयत्न
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळाजवळील मैदानात धडक झाल्यानंतर कॉकपिट आणि मागील बाजू सोडून इतर भाग चक्काचूर झाला होता. मदतकार्य करणाऱ्या जवानांनी विमानाच्या कॉकपिटची खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला.
मेक्सिकोचे संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 6 जवानांचा मृत्यू झालाय. तर, मृतांमध्ये पायलट आणि को-पायलट या दोघांचाही समावेश आहे. फ्लाइटअवेअरच्या माहितीनुसार विमान रविवारी मेक्सिकोतील जालपाला जाणार होते. मदतकार्य करणाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार बचावकार्य करणाऱ्यांनी विमान ताबास्को आणि विल्हेरमोसाला जात असल्याच मह्टलं होते.
अमेरिकेतील (America) डेनवर आंतरराष्ट्रीय विमान तळावर (Denver International Airport) शनिवारी (20 फेब्रुवारी) रात्री उशिरा मोठा अपघात होता होता टळला. युनायटेड एअरलाईन्सच्या (United Airlines) एका विमानाला उड्डाणानंतर काही वेळेत आकाशातच आग लागली आणि विमानाचे भाग जमिनीवर कोसळायला लागले. त्यानंतर विमानावरील नियंत्रण सुटत विमान जमिनीच्या दिशेने कोसळू लागलं. मात्र, विमान चालकाच्या प्रसंगावधानाने विमानातील 241 प्रवाशांचा जीव वाचलाय
संबंधित बातम्या:
Kerala Plane Crash Photos: केरळमध्ये विमानाचा थरकाप उडवणारा अपघात, 30 फूट खाडीत कोसळून दोन तुकडे
Karachi plane crash | पाकिस्तानात 100 प्रवाशांसह विमान इमारतीवर कोसळलं
9 दिवसांनंतर बेपत्ता AN-32 विमानाचे अवशेष सापडले
(Mexico air force plane crashed six people died)