वॉशिंग्टन : अमेरिकन मॉडेल आणि माजी पॉर्नस्टार मिया खलिफा (Mia Khalifa) सातत्याने भारतातील शेतकऱ्यांना (Indian Farmers) पाठिंबा देत ट्विट करत आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याने ज्या पद्धतीने मिया खलिफाचं कौतुक झालं, तसंच काही प्रमाणात तिला ट्रोल करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तिला शेतीबद्दल काय माहिती असाही प्रश्न विचारण्यात आला. मात्र, मियाने ट्रोल्सला सडेतोड उत्तर दिलं. आता मिया खलिफाने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात तिने अनोख्या पद्धतीने शेतकऱ्याचे आभार मानत पुन्हा शेतकऱ्यांना पाठिंबा दिलाय (Mia Khalifa again support Farmers by posting video with Samosa and Gulab jamun).
मिया खलिफाच्या या नव्या व्हिडीओत ती भारतीय पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे. यात समोसा आणि गुलाम जामुनचा समावेश आहे. हे पदार्थ खाताना मियाने शेतकऱ्यांचाही उल्लेख केला, तसेच ते जेवण पाठवणाऱ्यांचे आभार मानले. मिया खलिफा या व्हिडीओत म्हणाली, “खूप कष्ट करणे आणि त्यानंतर काही तरी मिळवणे ही भावना खूप चांगली आहे. जसं की मला आज हे स्वादिष्ट जेवण मिळालंय. माणुसकीच्या नात्याने सोशल मीडियावर मी शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्याने मला हे जेवण मिळालंय. त्याबद्दल मी रुपी कौर यांचे आभार मानते. याशिवाय या अप्रतिम गुलाम जामुनसाठी जगमीत यांचेही आभार.”
Thank you @rupikaur_ for this beautifully harvested feast, and thank you @theJagmeetSingh for the Gulab!!! I’m always worried I’ll get too full for dessert, so I eat it during a meal. You know what they say, one Gulab a day keeps the fascism away! #FarmersProtests pic.twitter.com/22DUz2IPFQ
— Mia K. (@miakhalifa) February 7, 2021
प्रत्येक गोष्टीला किंमत असते, असं सांगत या जेवणालाही एक किंमत असल्याचं मियाने सांगितलं.
‘दररोज एक गुलाब जामुन खाल्याने सामंतवाद दूर राहतो’
मियाने आपला व्हिडीओ शेअर करताना म्हटलं, “या स्वादिष्ट जेवणासाठी रूपी कौरचे धन्यवाद. गुलाब जामुन देण्यासठी जगमीत सिंह यांचे आभार. मला नेहमी काळजी असते की जेवणानंतर पोट भरल्याने गोड पदार्थ खायला माझ्या पोटात जागा राहत नाही. त्यामुळे आज मी जेवताना मध्येच गुलाब जामुन खाईल. तुम्हाला माहिती आहे का की दररोज एक गुलाब जामुन खाल्ल्यावर सामंतवाद दूर राहतो असं ते म्हणतात.”
Shoutout to the farmers ??? pic.twitter.com/0w95qVjUL1
— Mia K. (@miakhalifa) February 7, 2021
मिया खलिफाने नुकताच दिल्ली सीमेवर सुरु असलेल्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. तिने आधी इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली. तिच्या या फोटोत एका आंदोलकाने निषेधाची आणि आपल्या मागणीची एक पाटी उचललेली दिसत आहे. या पोस्टरवर शेतकऱ्यांना मारणं बंद करण्याची आणि दिल्लीत पुन्हा इंटरनेट सुरु करण्याची मागणी करण्यात आलीय.
मिया कॅलिस्टा उर्फ मिया खलिफा सध्या स्पोर्ट्स कमेंटेटर म्हणून काम करत आहे. ती यातच आनंद घेत करिअर करण्याचा विचार करतेय. लेबनानमध्ये जन्म झालेल्या मिया अमेरिकेतील एक लोकप्रिय मॉडेल आहे. मिया खलिफाने आपल्या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये खुलासा केला होता की, तिने 10 जून 2019 रोजी रॉबर्ट सँडबर्गसोबत कायदेशीर पद्धतीने लग्न केलंय. ही जोडी जून 2020 मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसणार होती, मात्र कोरोनामुळे हा कार्यक्रमच स्थगित झाला.
हेही वाचा :
सकाळी पॉपस्टार, आता पॉर्नस्टार, मिया खलिफा शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे मिया?
देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात स्वस्त, दिल्ल्लीच्या दिव्याखाली अंधार; संजय राऊतांचा घणाघात
शेतकरी आंदोलन : इंटरनेट बंदीचा मुद्दा गेला सर्वोच्च न्यायालयात
व्हिडीओ पाहा :
Mia Khalifa again support Farmers by posting video with Samosa and Gulab jamun