टोकियो | 8 फेब्रुवारी 2024 : देशातल्या लाखो, करोडो तरुणींमधून तिची निवड झाली. देशाची ब्युटी क्वीनचा मुकुट तिच्या डोक्यावर बसला. देशभरात तिची वाहवा झाली. पण, तिची ती एक चूक तिला महागात पडली. काही दिवसांपूर्वी ज्या देशाने तिची वाहवा केली तेच आता तिच्यावर टीका करू लागले. त्यामुळे तिला देशाने बहाल केलेला ब्युटी क्वीनचा ताज परत करावा लागला. अशी काय चूक त्या ब्युटी क्वीनच्या हातून घडली होती? तर, तिचे कुणावर तरी प्रेम होते हीच तिची चूक ठरली आणि तिला तो ‘सर’ ताज परत करावा लागला.
ही घटना जपान मधील आहे. युक्रेनमध्ये जन्मलेल्या 2024 चा ताज जिंकला. त्याची बरीच चर्चा झाली. अनेकांनी तिचे कौतुक केले. पण, याच दरम्यान काही जणांनी तिच्या ब्युटी क्वीनच्या मुकुटाला विरोध केला. कॅरोलिना शिनो हिचे सौंदर्य पारंपारिक जपानी सौंदर्यापेक्षा वेगळे असल्याचे अनेकांचे म्हणणे होते.
कॅरोलिना शिनो ही जपानी लोकांसारखे दिसत नाहीत असा आक्षेप काही लोकांनी घेतला. त्याचे कारण म्हणजे तिची आई तिच्या युक्रेनियन होती आणि तिने जपानी पुरुषाशी पुनर्विवाह केला होता. मात्र, हे प्रकरण शांत होत नाही तोच आणखी एक नवीन प्रकरण समोर आले.
कॅरोलिना शिनो हिला मिस जपान 2024 चा ताज मिळाला. याच चर्चेदरम्यान जपानमधील एका स्थानिक मासिकाने तिचे एका विवाहित पुरुषासोबत कथित प्रेम संबंध असल्याचे उघड केले. जपानमधील प्रभावशाली व्यक्तिमत्व डॉक्टर ताकुमा मेडा यांच्यासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचे या मासिकाने उघड केले. ही बातमी फुटल्यानंतर शिनो हिला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला.
स्पर्धेच्या आयोजकांनी यांनी शिनोला पाठिंबा देताना डॉ. ताकुमा मेदा यांच्या वैवाहिक स्थितीबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, शिनो हिने याबद्दल सर्वांची माफी मागितली. शिनो हिने इंस्टाग्रामवर जाहीर माफी मागितली तसेच मिस जपान 2024 चा मुकुटही परत केला. यानंतर मिस जपान असोसिएशनने तिचा मुकुट परत घेतला.
मिस जपान असोसिएशनने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. श्री. मेदा यांच्या पत्नी, कुटुंबीय आणि सहभागी असलेल्या प्रत्येकाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. आदल्या दिवशी एजन्सीला स्पष्ट केले होते की यात काही तरी चूक झाली आहे. पण, गोंधळ आणि भीतीमुळे सत्य सांगणे अशक्य झाले. याबद्दल आम्हाला खेद वाटतो असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.