जकार्ता : इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी जकार्ता येथून शनिवारी 62 जणांना घेवून (Indonesia Plane Crash Suspected Debris) जाणाऱ्या श्रीविजय एअर फ्लाइट 182 चा उड्डाणानंतर काहीच वेळात संपर्क तुटला होता. या विमानाला शोधण्यासाठी आता बचाव अभियान चालवण्यात येत आहे. बचाव दलाने दिलेल्या माहितीनुसार, शहरापासून दूर समुद्रात विमानाचे संशयित अवशेष (Suspected Debris) आढळून आले आहेत (Indonesia Plane Crash Suspected Debris).
या विमानाने इंडोनेशियाची (Aviation Officials) राजधानी जकार्ता इथून उड्डान घेतल्यानंतर लगेचच एव्हिएशन अधिकाऱ्यांशी संपर्क तुटला. विमानाने शनिवारी दुपारी सोकार्नो-हट्टा विमानतळावरुन पोंटियानकसाठी उड्डाण केलं. काहीच वेळात रडार स्क्रीनवरुन गायब झालं होतं. FlightRadar24 मधील आकडेवारीनुसार, हे विमान बोईंग 737-500 सीरिजमधलं होतं. विमानाशी दुपारी 2:40 वाजता अखेरचा संपर्क साधण्यात आला होता.
Sriwijaya Air flight #SJ182 lost more than 10.000 feet of altitude in less than one minute, about 4 minutes after departure from Jakarta.https://t.co/fNZqlIR2dz pic.twitter.com/MAVfbj73YN
— Flightradar24 (@flightradar24) January 9, 2021
देशाच्या शोध आणि बचाव संस्था बसनारसचे प्रमुख बॅगस पुरुहितो यांनी सांगितलं, “जकार्ताच्या उत्तरेला पाण्यामध्ये शोध करण्यासाठी एका पथकाला पाठवण्यात आलं होतं. आतापर्यंत कुठलंही रेडिओ सिग्नल मिळालेलं नाही.” तर, आणखी एक अधिकारी एगस हरियोनो यांनी रॉयटर्सला सांगितलं की, “विमानाचे संशयित अवशेष समुद्रात आढळून आले आहेत. पण, हे त्याच विमानाचे अवशेष आहेत की नाही याबाबत सध्या कुठलीही अधिकृत माहिती नाही.”
इंडोनेशियाच्या परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “62 प्रवाशी आणि चालकांसह विमान समुद्रात दुर्घटनाग्रस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अधिकाऱ्यांनी या विमानाला शोधण्यासाठी शोध कार्य सुरु केलं आहे. या विमानाने जकार्ता येथून पोंटियानकसाठी उड्डाण घेतलं होतं”.
श्रीविजय एअर एसजे-182 एक बोईंग 737-500 सीरिजचं विमान आहे. याचा रजिस्ट्रेशन नंबर PK-CLC (MSN 27323) आहे. जकार्ता ते पोंटियानकपर्यंतच्या 90 मिनिटांच्या उड्डाणात 56 यात्री आणि 6 चालक होते. पोंटियानक इंडोनेशियाच्या बोर्निया बेटावर पश्चिम कालिमंतन प्रदेशाची राजधानी आहे (Indonesia Plane Crash Suspected Debris).
फ्लाइटरडार 24 ने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीविजय एयर #SJ182 ने जकार्ताहून सुटल्यानंतर 4 मिनिटांनी 10,000 फूट उंचीवर असताना एका मिनिटापेक्षाही कमी वेळात संपर्क तुटला. फ्लाइटरडार 24 ने ट्वीट करुन त्याविषयी माहिती दिली आहे. दरम्यान, विमान शोधण्यासाटी सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत विमानाचं नेमकं लोकेशन समजू शकलेलं नाही.
खरंतर, विमान सुरक्षेला घेऊन आधीच वाद पेटला आहे. अशात आता या घटनेमुळे आणखी गोंधळ उडाला आहे. यामुळे अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आहे. तर विमानाच्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे त्याची गतीही कमी होते. यामुळेही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
Indonesia Plane Crash Suspected Debris
संबंधित बातम्या :
Breaking : श्रीविजय एअर फ्लाइट 182 चा संपर्क तुटला, उड्डाण घेताच हवेमध्ये गायब
Air Strike | बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये 300 मृत्यू, पाकच्या डिप्लोमॅटचं मोठं वक्तव्य
कोरोना लसीकरणानंतर फिरायला जायचा प्लान करताय? पासपोर्टसोबत ‘हे’ सर्टिफिकेट दाखवावं लागू शकतं