NASA MARS Mission 2021 Perseverance Rover Landing वॉशिंग्टन : अमेरिकेची आंतराळ संशोधन संस्था नासासाठी (National Aeronautics and Space Administration) आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. गुरुवारी (18 फेब्रुवारी) नासाचं रोव्हर परसिव्हरन्स मंगळ ग्रहाच्या (NASA MARS Mission) पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. मंगळावर उतरत असलेल्या या रोव्हरचा (Perseverance landing) उद्देश या ठिकाणी जीवनाच्या शक्यता तपासणं हा आहे. नासाचं हे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरुन येथील नमुने गोळा करेल. कॅलिफोर्नियातील अंतराळ संस्थेच्या जेट प्रोपल्शन लॅबमधील (Jet Propulsion Laboratory) संशोधकांना या मिशनमध्ये महत्त्वाची माहिती हाती लागेल अशी आशा आहे. त्यामुळे या मिशनकडून लॅबला सिग्नल मिळेपर्यंत सर्वांचीच धाकधूक वाढलीय (NASA MARS Mission 2021 Perseverance Rover Landing Know all about it).
मंगळावर पोहचणारं आणि मंगळाच्या पृष्ठभागावर लँडिंग करणारं हे 3 तिसरं रोव्हर आहे. याआधी दोन अन्य अंतराळ यानं मंगळावर पोहचलेली आहेत. यात संयुक्त अरब अमीरातच्या (UAE Mars Mission) यानाचा आणि चीनच्या (China Mars Mission) अंतराळ यानाचा समावेश आहे. या तिन्ही मोहिमा मागील वर्षी कोरोना काळात जुलै महिन्यात लाँच करण्यात आल्या होत्या. हा काळ मंगळ मोहिमेसाठी सर्वोत्तम मानला जातो. कारण हा काळ मंगळ ग्रहावरील मोहिमेसाठी सर्वाधिक अनुकुल मानला जातो. या अंतराळ यानांनी मंगळावर पोहचण्यासाठी मागील 7 महिन्यांमध्ये जवळपास 300 मिलियन मैलाचं अंतर पार केलंय. परसिव्हरन्स नासाचं आतापर्यंत पाठवलेलं सर्वात मोठं आणि अद्याधुनिक रोव्हर आहे.
“That descent stage takes us all the way down to about 20 meters off the ground. That’s when we start the skycrane maneuver.”
Tomorrow is our @NASAPersevere rover’s entry, descent and landing on Mars. Get ready: https://t.co/Y0O9T1rDov pic.twitter.com/jmC7dIiwQ0
— NASA (@NASA) February 18, 2021
नासाचं मंगळावर पोहचणारं पाचवं रोव्हर
मंगळावर पोहचल्यानंतर परसिव्हरन्स असं नववं अंतराळ रोव्हर असणार आहे (NASA Mars Mission Details). एका कारच्या आकाराचं प्लुटोनियम-पार्वड रोव्हर मंगळावर उतरणारं नासाचं पाचवं रोव्हर आहे. हे यान अमेरिकन वेळेनुसार सायंकाळी 3.55 मिनिटांनी उतरणार आहे. 23 कॅमेऱ्यांनी सज्ज असणारं नासाचं हे रोव्हर केवळ व्हिडीओ रेकॉर्ड करणार नाही, तर मंगळावरील आवाजही रेकॉर्ड करणार आहे. यासाठी त्यात खास दोन मायक्रोफोन लावण्यात आलेत.
शेवटचे 7 मिनिटं नासासाठी निर्णयक राहणार
या रोव्हरसोबत अन्य ग्रहावर जाणारं पहिलं हेलिकॉप्टर (Ingenuity) देखील आहे. हे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरताना अखेरचे 7 मिनिटं फारच महत्त्वाचे असणार आहेत (7 Minutes of Terror). कारण या काळात रोव्हर (NASA Mars mission countdown) 12 हजार मैल प्रतितास वेगापासून 0 मैल प्रतितास असा प्रवास करत पृष्ठभागावर उतरेल. रोव्हरची गती कमी करण्यासाठी त्यामध्ये रेट्रोरॉकेट आणि पॅराशूट लावण्यात आलेय.
लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार
नासाच्या या मोहिमेची जगभरात चर्चा आहे. तुम्ही या मिशनचं लाईव्ह स्ट्रिमिंगही पाहू शकणार आहे. नासाच्या पब्लिक टीव्ही चॅनल आणि सर्व सोशल मीडिया खात्यावरही याचं थेट प्रक्षेपण होईल. भारतीय वेळेनुसार रात्री 12.45 वाजता याचं प्रक्षेपण सुरु होईल (Perseverance rover landing time).
हेही वाचा :
नासावर भारतीय वंशाच्या महिलेचा झेंडा, भव्या लाल जगातल्या शक्तिशाली संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी
कधी अंतराळातून बर्फाने झाकलेला हिमालय पाहिलाय? नासाने काढलेला हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल WOW!
जगातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान उडवणारा भारतीय वंशाचा वैमानिक रचणार नवा इतिहास
व्हिडीओ पाहा :
NASA MARS Mission 2021 Perseverance Rover Landing Know all about it