वॉशिंग्टन: जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासाच्या (Nasa) प्रीझरव्हन्स रोव्हरनं मंगळ ग्रहावरील तीन महिन्यांचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. नासाच्या Ingenuity हेलिकॉप्टरनं नुकतेच मंगळ ग्रहावरील चौथं उड्डाण पूर्ण केल्याचं पाहायला मिळालं होतं. विशेष बाब म्हणजे यामध्ये हेलिकॉप्टरच्या पाती फिरल्यामुळे निर्माण होणारा आवाज देखील नासाच्या रोव्हरनं रेकॉर्ड केला होता. नासानं आता मंगळ मोहिमेतील पुढील टप्प्याची माहिती शेअर केली आहे. नासाचा प्रीझरव्हन्स रोव्हर मंगळावरील प्राचीन सूक्ष्मजीव सृष्टीच्या पाऊलखुणांचा शोध घेणार आहे. (Nasa Mars Perseverance rover started seeking of past evidence of Microbial life on Red Planet)
नासाकडून या बाबत एक ट्विट करण्यात आलं आहे. त्यामध्ये नासाचा प्रीझरव्हन्स रोव्हर आता मंगळावरील फोटो घेण्याऐवजी विज्ञान संशोधक म्हणून काम करेल. मगंळावरील प्राचीन अशा ठिकाणी जीवसृष्टीचा शोध घेण्याची मोहिम सुरु आहे, असं ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे. प्रीझऱव्हन्स रोव्हर मंगळ ग्रहावरील भूशास्त्र आणि रासायनिक शास्त्राच्या दृष्टीनं अभ्यास करेल.प्रीझरव्हन्स रोव्हरवरील सुपरकॅमद्वारे लेझरच्या सहाय्यानं मंगळावरील दगडांच्या निर्मितीचं संशोधन, अभ्यास केला जाणार आहे.
प्रीझरव्हन्स रोव्हरवर नासाच्या संशोधकांनी शॉर्ट स्कॅनिंग हॅबिटेबल इनवायरमेंटस विथ रामन अँड ल्युमिनेस्केसन्स फॉर ऑरगॅनिक अँड केमिकल्स (SHERLOCK) हा डिव्हाईस बसवला आहे. या डिव्हाईसमुळे मंगळावरील दगडांच्या रचनेचा सखोल पणे अभ्यास करण्यास मदत होईल. नासानं आता खऱ्या अर्थानं मंगळ मोहीम सुरु झाली, असं देखील म्हटलं आहे.
The time has come: I’m switching from on-scene photographer to science investigator. Did this ancient lakebed ever have life? The tools I brought will help begin the hunt. I’m a bot on a mission. https://t.co/SjLUcUSCY4
— NASA’s Perseverance Mars Rover (@NASAPersevere) May 11, 2021
जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासानं मंगळ मोहिमेविषयीचा एक व्हिडीओ सोशल मीडयावर शेअर केला आहे. या व्हिडीओत नासाच्या Ingenuity हेलिकॉप्टरचं चौथं उड्डाण पूर्ण केल्याचं पाहायला मिळतं. विशेष बाब म्हणजे यामध्ये हेलिकॉप्टरच्या पाती फिरल्यामुळे निर्माण होणारा आवाज देखील नासाच्या रोव्हरनं रेकॉर्ड केला आहे.
?? New sounds from Mars: Our @NASAPersevere rover caught the beats coming from our Ingenuity #MarsHelicopter! This marks the first time a spacecraft on another planet has recorded the sounds of a separate spacecraft.
?? Turn the volume up: https://t.co/o7zG6mQJzx pic.twitter.com/s8Hm3dhcgg
— NASA (@NASA) May 7, 2021
नासाच्या मंगळ ग्रहावरील रोव्हरनं पहिल्यांदाच हेलिकॉप्टरच्या पात्याचा आवाज रेकॉर्ड केला आहे.नासानं हा व्हिडीओ 7 मे रोजी सोशल मीडियावर शेअर केला आहे. नासाच्या मंगळ ग्रहावरील रोटोरक्राफ्ट हेलिकॉप्टरनं मंगळ ग्रहावरील चौथं उड्डाण यशस्वीरित्यापूर्ण केलं. हा व्हिडीओ एकूण तीन मिनिटांचा आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला हेलिकॉप्टरच्या उड्डाणापासून हळूहळू आवाज येत जातो. रोटोरक्राफ्टची पाती 2400 आरपीएमच्या वेगान फिरतात त्यामुळे निर्माण होणारा आवाज व्हिडीओमध्ये ऐकायला भेटतो.
संबंधित बातम्या:
Water on Mars: मंगळ ग्रहावर पाणी असल्याचे पुरावे, नासाच्या संशोधनात उलगडा
(Nasa Mars Perseverance rover started seeking of past evidence of Microbial life on Red Planet)