नवी दिल्ली : विश्व कसं दिसतं, असा प्रश्न प्रत्येकाला लहानपणापासून पडलेला असतो. तारे, सूर्य, ग्रह कसे दिसत असतील? संपूर्ण विश्व कसं दिसत असेल, असेही प्रश्न असतात, याच प्रश्नांचं एकंच उत्तरं महासत्तेन शोधलंय. ‘नासा’नं (NASA) सोमवारी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपनं (James Webb Space Telescope) घेतलेली विश्वाची पहिली रंगीत प्रतिमा प्रसिद्ध केली. हे आतापर्यंत पाहिलेलं विश्वाचं सर्वोच्च-रिझोल्यूशन चित्र आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनीही या पहिल्या रंगीत प्रतिमेची माहिती दिली. विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक क्षण आहे, असं जो बायडन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. खगोलशास्त्र आणि अवकाश यासह अमेरिका आणि संपूर्ण मानवतेसाठी हा चांगला दिवस आहे. राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी वेबच्या पहिल्या प्रतिमांपैकी एक प्रसिद्ध केली आहे, असं म्हटलंय. विशेष म्हणजे हे आतापर्यंत पाहिलेले विश्वाचे सर्वात खोल दृश्य आहे. नासाचे अधिकारी नेल्सन यांनी एका निवेदनात म्हटलंय की, ही आपल्या विश्वाची आतापर्यंतची सर्वात खोल प्रतिमा आहे. पत्रकार परिषदेनंतर प्रतिमा एकामागून एक लोकांसमोर प्रदर्शित केल्या जातील.
It’s here–the deepest, sharpest infrared view of the universe to date: Webb’s First Deep Field.
हे सुद्धा वाचाPreviewed by @POTUS on July 11, it shows galaxies once invisible to us. The full set of @NASAWebb‘s first full-color images & data will be revealed July 12: https://t.co/63zxpNDi4I pic.twitter.com/zAr7YoFZ8C
— NASA (@NASA) July 11, 2022
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून घेतलेल्या विश्वाच्या पहिल्या पूर्ण-रंगीत प्रतिमेचं अनावरण केलं. सोमवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसमध्ये एका समारंभात बायडन यांनी म्हणालंय की, ‘आज एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण, जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात शक्तिशाली अंतराळ विज्ञान दुर्बिणीनं आपल्या विश्वाच्या इतिहासात एक नवीन ऑफर दिली आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी गेल्या महिन्यात एका ब्रीफिंगमध्ये पत्रकारांना सांगितलं की आम्ही मानवाला विश्वाचे एक नवीन दृश्य देणार आहोत, जे आम्ही यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं.
नासानं त्याच्या सर्वात शक्तिशाली स्पेस टेलिस्कोप जेम्स वेबमधून घेतलेल्या खोल-स्पेसच्या पहिल्या चित्रांपूर्वी एक सुंदर टीझर फोटो प्रसिद्ध केला होता. यामध्ये नासाचे बहुप्रतिक्षित डीप स्पेसचे फोटो पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं. शास्त्रज्ञांच्या मते, हे शक्तिशाली उपकरण विश्वाच्या उत्पत्तीशी संबंधित अनेक रहस्ये उघडू शकते. ‘जेव्हा हे चित्र काढलं गेलं तेव्हा या अंधुक आकाशगंगांमधील तपशीलवार रचना स्पष्टपणे पाहून मला आनंद झाला, असं हनीवेल एरोस्पेस येथील वेब टेलिस्कोपच्या उत्कृष्ट मार्गदर्शन सेन्सरचे प्रोग्राम शास्त्रज्ञ नील रोलँड्स यांनी म्हटलंय. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं की वेब दुर्बिणी पूर्वीच्या कोणत्याही दुर्बिणीपेक्षा अंतराळातील सर्वात दूरचे अंतर पाहण्यास सक्षम आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ही दुर्बीण लाँच करण्यात आली होती. ती सध्या पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किमी दूर सूर्याभोवती फिरत आहे. ही दुर्बीण तिच्या आरसा आणि उपकरणांच्या मदतीनं अंतराळातील इतर दुर्बिणीपेक्षा जास्त अंतर पाहू शकते. दुर्बिणीतील उपकरणे त्याला धूळ आणि वायूमधूनही पाहण्यास मदत करतात.