वॉशिंग्टन: अमेरिकेच्या नासा (NASA) संस्थेकडून आगामी मोहिमेसाठी काही दिवसांपूर्वीच चमूची घोषणा करण्यात आली. यामध्ये भारतीय वंशाचे वैमानिक राजा चारी यांचा समावेश आहे. राजा चारी (Raja Chari ) हे नासाच्या मोहिमेवर जाणारे तिसरे भारतीय ठरतील. नासाच्या मोहिमेसाठी निवड होणे ही माझ्यासाठी उत्साहाची आणि सन्मानाची बाब असल्याचे राजा चारी यांनी सांगितले. (Raja Chari as commander selected for SpaceX Crew 3 mission)
राजा चारी हे शाळेत असल्यापासूनच वैमानिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून होते. अमेरिकन वायूदलात दाखल झाल्यानंतर त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, आता राजा चारी हे एका अविश्वसनीय स्वप्नाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहेत. राजा चारी यांनी अमेरिकी वायूदलाच्या ताफ्यात असलेल्या F16 हे जगातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान उडवून आपली योग्यता सिद्ध केली आहे.
राजा चारी हे नासाच्या 2024 सालच्या चांद्र मोहिमेचा भाग असतील. या मोहिमेचे नाव आर्टमिस असे आहे. यानिमित्ताने एखाद्या चांद्र मोहिमेत पहिल्यांदाच महिला सहभागी होणार आहेत. याशिवाय, राजा चारी हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या 22 अंतराळयात्रींच्या तुकडीचे नेतृत्त्व करणार आहेत.
24 जून 1977 रोजी राजा चारी यांचा विस्कॉन्सिन येथे जन्म झाला होता. राजा चारी यांचे वडील श्रीनिवास चारी हैदाराबादवरून अमेरिकेत स्थायिक झाले होते. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्रीनिवास चारी यांनी आपले संपूर्ण जीवन अमेरिकेत घालवले. त्यांना शिक्षणाचे महत्त्व ठाऊक होते. त्यामुळे मला लहानपणापासूनच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे माहिती असल्याचे राजा चारी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
राजा चारी यांची 2017 साली नासाने अंतराळवीर म्हणून निवड केली होती. तेव्हापासून राजा चारी यांना अंतराळ मोहिमांचे प्रशिक्षण दिले जात होते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता राजा चारी अंतराळ मोहिमेसाठी सज्ज आहेत.
राजा चारी हे अमेरिकन वायूदलात कर्नलच्या हुद्द्यावर आहेत. त्यांनी आर्मी कमांड आणि जनरल स्टाफ महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. चारी अमेरिकन वायूदलाच्या 461व्या स्क्वाड्रनचे कमांडरही होते. त्यांना डिफेन्स मेरिटोरिया सर्विस मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. इराक युद्धातील अतुलनीय शौर्यासाठी त्यांना इराक कॅम्पेन मेडलने गौरवण्यात आले होते.
कर्नल राजा चारी यांच्याकडे लढाऊ विमानांचा 2000 पेक्षा जास्त उड्डाणांचा अनुभव आहे. आतापर्यंतच्या कारकीर्दीत त्यांनी फ-35, एफ-15, एफ-16 और एफ-18 आणि एफ-15 यासारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने हाताळली आहेत. इराक युद्धात त्यांनी एका धोकादायक मोहिमेत आपले कौशल्य दाखवून दिले होते.
इतर बातम्या:
Chandrayaan-2 : नासाकडून कौतुकाची थाप, इस्रोला मोठी ऑफर
‘विक्रम, लवकर उत्तर दे… पावती फाडणार नाही’
विक्रम लँडरला शोधण्यासाठी आता ‘नासा’ही मदतीला
(Raja Chari as commander selected for SpaceX Crew 3 mission)