Nigeria Military Plane Crashed : नायजेरियामध्ये रविवारी वायू सेनेचं एक विमान अपघातग्रस्त झालं. या अपघातात विमानातील सर्वच्या सर्व सात जाणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. नायजेरियाच्या वायू सेनेचे प्रवक्ते इबीकुनले दारामोला यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली (Nigeria Military Plane Crashed).
“‘किंग एअर 350’ (Beechcraft KingAir B350i aircraft) विमानाने राजधानी अबुजा येथील विमानतळावरुन उड्डाण घेतलं. तेव्हाच विमानाच्या इंजिनमध्ये गडबड असल्याचं लक्षात आलं आणि विमानाने परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपघातग्रस्त झाला. दुर्दैवाने या अपघातात विमानातील सातही जणांचा मृत्यू झाला आहे”, असं ट्वीट इबीकुनले दारामोला यांनी केलं.
AIRCRAFT ACCIDENT
This is to confirm that a Nigerian Air Force (NAF) Beechcraft KingAir B350i aircraft crashed while returning to the Abuja Airport after reporting engine failure enroute Minna. First responders are at the scene. Sadly, all 7 personnel on board died in the crash
— Air Vice Marshal Ibikunle Daramola (@KunleDaramola3) February 21, 2021
विमान वाहतूक मंत्री हादी सिरिका यांनी ट्वीट केलं की हा अपघात अत्यंत घातक असल्याचं दिसतंय. त्यांनी म्हटलं की, सेना प्रकरणाचा तपास करत आहेत. विमान अबूजाच्या उत्तर-पश्चिमेकडे जवळपास 100 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या मिन्ना शहरात जात होता. प्रत्यक्षदर्शिंच्यामते हा अपघात अत्यंत भयानक होता.
हा दुर्दैवी अपघात ज्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला त्यांच्यामते, असा भयानक अपघात गेल्या बऱ्यात काळापासून घडलेला नाह. विमानतळावर गेल्या नऊ वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितलं की , हा अपघात पाहून सर्वच घाबरले होते. लोक मोठ-मोठ्याने ओरडत होते. गेल्या दशकापासून आम्ही इतकं भयावह दृष्य पाहिलेलं नाही (Nigeria Military Plane Crashed).
घटना स्थळाच्या फोटोंमध्ये अपघातग्रस्त विमानातून धूर निघताना दिसतो आहे. लोकांनी स्थानिक मीडियाला सांगितलं की विमान टर्न घेण्याचा प्रयत्न करत होता. पण, विमानतळापर्यंत पोहोचण्यापूर्वीच ब्लास्ट झाला.
VIDEO: आकाशातच विमानाच्या इंजिनमध्ये स्फोट, 241 लोकांचा जीव टांगणीला, अंगाचा थरकाप उडवणारी दृष्येhttps://t.co/hzIT3GS3kD#PlaneAccident #Fire
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2021
Nigeria Military Plane Crashed
संबंधित बातम्या :
Plane Accident : एअर इंडियाचं विमान वीजेच्या खांबाला धडकलं!
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर क्वालिस कंटेनरला धडकली, तरुणाचा मृत्यू, चालक जखमी