सर्वात मोठी बातमी : बायडन यांचा मृत्यू होणार, हॅरिस होतील राष्ट्रपती; तिच्या भविष्यवाणीने खळबळ; कुणी केली भविष्यवाणी?

| Updated on: Apr 28, 2023 | 9:48 PM

अमेरिकेत पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. त्यापूर्वीच माजी गव्हर्नर आणि रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या निकी हेलीने मोठा दावा केला आहे. तिच्या या दाव्याने केवळ अमेरिकाच नव्हे तर जगभर खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी बातमी : बायडन यांचा मृत्यू होणार, हॅरिस होतील राष्ट्रपती; तिच्या भविष्यवाणीने खळबळ; कुणी केली भविष्यवाणी?
Image Credit source: social media
Follow us on

वॉशिंग्टन : पुढील वर्षी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची (American Presidential election) निवडणूक होणार आहे. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन हे दोन्ही पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने उभे ठाकणार आहे. या दोन्ही पक्षाचे नेते जो बायडन (JoeBiden) आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे आमनेसामने दिसतील. ट्रम्प यांचं वय 75 वर्ष आहे. मात्र, तरीही ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या निकी हेली यांनी एका मुलाखतीत धक्कादायक विधान केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मला वाटतं जो बायडेन 84 वर्षापर्यंत जगतील. आता त्यांचं वय 80 आहे. पुढील वर्षी निवडणुका होणार आहे, असं निकी हेली म्हणाली. निकीने निवडणुकीपूर्वीच अमेरिकन जनतेच्या समोर एज कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. निकी हेली अमेरिकेच्या साऊथ केरोलाइना या राज्याची माजी गव्हर्नर होती. तिने फॉक्स न्यूजला मुलाखत दिली आहे. त्यात तिने एज कार्ड पुढे केलं आहे. जर अमेरिकेच्या जनतेने बायडेन यांना आव्हान दिलं तर ते कमला हॅरिसला मतदान करत आहेत, असं समजायला हरकत नाही, असा दावा निकीने केला आहे.

निकीचा खळबळजनक दावा

निकी हेलीची ही मुलाखत बुधवारची आहे. एका गोष्टीबाबत आपण सर्वांनी क्लिअर असायला हवं. ते म्हणजे तुम्ही जर बायडन यांना निवडून दिलं तर वास्तविक तुम्ही कमला हॅरिस यांनाच निवडून दिलं आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण बायडन आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत. वाढत्या वयामुळे बायडन यांचा मृत्यू होईल. त्यानंतर कमला हॅरिसच राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारतील, असं धक्कादायक विधान करून निकीने खळबळ उडवून दिली आहे.

बायडन यांची घोषणा

निकीची मुलाखत येण्याच्या एक दिवस आधी. म्हणजे मंगळवारी जो बायडन यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर निकीने केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. निकीने यापूर्वीही एजबार बाबत आपली मते व्यक्त केली आहे. 75 व्या वर्षी निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराच्या मानसिक स्थितीचं परीक्षण केलं पाहिजे, असं तिने यापूर्वी म्हटलं होतं. व्हाईट हाऊस बायडन यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. बायडन यांचे एक्सरसाईज करतानाचे व्हिडीओ जारी केले जात आहेत. बायडन अजूनही फिट आहेत हे दाखवण्यासाठीच हे केलं जात आहे. निवडणूक लढण्यासाठी वयाचा काहीच संबंध नसतो, असं बायडन यांनी म्हटलंय. मी तर माझा नंबरही सागू शकत नाही. मला चांगलं वाटत असून मी आनंदी आहे, असंही बायडन यांनी म्हटलं आहे.