नवी दिल्ली : पाकिस्तानवर (Pakistan) आर्थिक संकट कोसळलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून बेल आऊट पॅकेज मिळावे, यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. सध्या पाकिस्तान दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. महागाई प्रचंड वाढली (food grains expensive ) आहे. अन्नधान्याची किमती खूप जास्त आहेत. महागाई २७ टक्के वाढली आहे. विदेशी मुद्रा भंडारही दिवसेंदिवस कमी होत आहे. फक्त ३ अरब डॉलर उपलब्ध आहेत. यातून पाकिस्तान एक महिनाभरही आयात करू शकत नाही. अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी म्हटलं की, दहशतवाद्यांनी पाकिस्तानात एफडीआय थांबवली आहे. चीनच्या कर्जाच्या बोझ्याखाली पाकिस्तान दबत आहे. अफगाणिस्तान आणि भारताशी चांगले संबंध नसल्याने पाकिस्तानातील व्यापाराचे संबंध कमी करण्यात आलेत. पाकिस्तान कुटनीती आणि राजनैतिक संकटाचा सामना करत आहे. मुस्लीम जगतातही पाकिस्तानबद्दल निराशेचे वातावरण आहे.
पाकिस्तान हे जगातील पाचव्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे. पण, या देशाची अवस्था सध्या श्रीलंका आणि व्हेनेझुयला देशांसारखी झाली आहे. पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत मागे पडला आहे. पाकिस्तानातील महागाई गेल्या ५० वर्षांतील सर्वात जास्त महागाई आहे.
विदेशी मुद्रा भंडारही कमी होत आहे. आता फक्त तीन अरब डॉलर विदेशी मृद्रा उरली आहे. यामुळं एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी पाकिस्तान टिकाव धरू शकणार नाही. महागाई खूप वाढली आहे. गहू, कांदा, गॅस, सिलिंडरच्या भावात वाढ झाली आहे. २० किलो गव्हाचा आटा १ हजार १६४ रुपयांना झाला आहे. पाकिस्तानच्या बिझनेस काँसिलने अर्थव्यवस्थेला स्थिर करण्यासाठी पाह हजार रुपयांची नोट बंद करण्याची सूचना केली आहे.
पाकिस्तानातील पेट्रोल पंपांमध्ये तेल नाही. पंजाब भागातील बऱ्याच पेट्रोल पंपांवर अशी परिस्थिती आहे. पाकिस्तान पेट्रोल पंप डीलर असोसिएशननं सांगितलं की, लाहोरमधील ४५० पेट्रोल पंपांपैकी ७० पेट्रोल पंपांवर तेल नाही. पाकिस्तानातील तेल कंपन्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. पाकिस्तान बऱ्याच प्रमाणात दुसऱ्यांवर अवलंबून आहे. पाकिस्तानातील निर्यातीमध्ये कपडा आणि कृषीशी संबंधित वस्तू आहेत. पाकिस्तानचा खर्च वाढत आहे. त्यामानान उत्पन्न होत नाही. त्यामुळं पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.