Nobel Prize 2022: साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा या लेखिकेला मिळाला सन्मान

| Updated on: Oct 06, 2022 | 5:40 PM

साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा नुकतीच झालेली आहे. एका फ्रेंच लेखिकेला यंदाच्या साहित्याच्या नोबेल पुरस्काराचा सन्मान मिळाला आहे.

Nobel Prize 2022:  साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा या लेखिकेला मिळाला सन्मान
ॲनी एरनॉक्स
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, नोबेल पारितोषिक (Nobel Prize 2022) हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केल्या जातो.  2022 सालचे साहित्याचे नोबेल नुकतेच जाहीर झाले आहे. यंदाचा नोबेल फ्रेंच लेखिका ॲनी एरनॉक्स (Annie Ernaux) यांना जाहीर झाला आहे. ॲनीचा जन्म 1 सप्टेंबर 1940 रोजी झाला. त्या फ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या  प्राध्यापिका आहे. त्यांचे साहित्यिक कार्य बहुतेक आत्मचरित्रात्मक आणि समाजशास्त्रावर आधारित आहे.

यांना मिळाले रसायनशास्त्राचे नोबेल

यापूर्वी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या कॅरोलिन बर्टोझी, कोपनहेगन (डेनमार्क) विद्यापीठाचे मॉर्टन मीलडोल आणि के. बॅरी शार्पलेस यांना दिले. क्लिक रसायनशास्त्र आणि बायोर्थोगोनल रसायनशास्त्राच्या विकासासाठी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

यांना मिळाले भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले

2022 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारही जाहीर झाला आहे. क्वांटम मेकॅनिक्स क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल या वर्षी हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना देण्यात आला. फ्रान्सचे शास्त्रज्ञ एलेन आस्पेक्ट, अमेरिकेचे जॉन एफ क्लॉजर आणि ऑस्ट्रियाचे अँटोन जेलिंगर यांना 10 दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे 7.5 कोटी रुपये) मिळणार आहेत. स्कॉटहोम येथील रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सने मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली.

हे सुद्धा वाचा

स्वीडनच्या पाबो यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले

यंदाचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्वीडिश शास्त्रज्ञ स्वंते पाबो यांना जाहीर झाले आहे. ‘मानवांची उत्क्रांती’ या विषयावरील शोधासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पाबो यांनी आधुनिक मानव आणि विलुप्त प्रजातींच्या जीनोमची तुलना करून त्यांच्यातील साम्य दर्शविले होते.

शांततेचा नोबेल पुरस्कार होणार शुक्रवारी जाहीर

या वर्षीचा (२०२२) शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी म्हणजे 7 ऑक्टोबरला  जाहीर होणार असून अर्थशास्त्र क्षेत्रातील पुरस्कार 10 ऑक्टोबरला जाहीर केला जाणार आहे.