प्योंगयांग : उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong-un Sends New Year Cards) यांनी देशातील जनतेला हैराण करणाऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत यामुळे उत्तर कोरियातील सामान्य जनता आवाक झाली आहे. किम जोंग यांनी देशातील जनतेला ग्रिटिंग कार्ड पाठवून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे त्यांच्या प्रतिमेपेक्षा अगदी विपरित आहे. त्यामुळेच उत्तर कोरियासाठी हा एक दुर्मिळ क्षण मानला जात आहे (Kim Jong-un Sends New Year Cards).
किम जोंग यांनी या ग्रिटिंग कार्डमध्ये कठीण प्रसंगी ‘विश्वास आणि समर्थन’ दिल्याबाबत जनतेचे धन्यवाद मानले आहेत. सोबतच त्यांनी नववर्षाच्या निमित्ताने जनतेच्या आनंद आणि चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली आहे.
किम जोंग उन हे नेहमी वर्षाच्या सुरुवातीला भाषण देतात. पण, यंदा कदाचित ते असं करणार नाही. किम जोंग हे फक्त सत्ताधारी पक्षाला संबोधित करतील, अशी शक्यता आहे. कोरियन सेंट्रल न्यूज एजेन्सीनुसार, जनतेला पाठवण्यात आलेल्या कार्डमध्ये किम जोंग यांनी लिहिलं, “मी देशाला त्या नव्या युगात आणण्यासाठी खूप मेहनत करेन. ज्यामुळे आपल्या लोकांचे आदर्श आणि सर्व इच्छा पूर्ण होतील. वाईट परिस्थितही आमच्या पक्षावर विश्वास दाखवल्याबाबत आणि आम्हाला समर्थन दिल्याबाबत मी लोकांचे आभार मानतो” (Kim Jong-un Sends New Year Cards).
किम जोंग पुढे लिहितात, “मी प्रामाणिकपणे देशवासीयांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या आरोग्याची प्रार्थना करतो”. न्यूज एजेन्सीने भलेही स्पष्ट केलं असेल की किम जोंग यांनी सर्वांना ग्रिटिंग कार्ड पाठवले. पण, याबाबत खात्री करणं अशक्य आहे. 25 मिलिअन लोकांना किम जोंगचे कार्ड मिळाले की नाही, याची खात्री करता येणार नाही. 1995 नंतर ही पहिली वेळ आहे की जेव्हा उत्तर कोरियाच्या कुठल्या हुकुमशाहाने देशवासीयांना कार्ड पाठवून शुभेच्छा दिल्या असेल.
नवीन वर्षाच्या निमित्ताने उत्तर कोरियात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. प्योंगयांगच्या प्रमुख चौकात खूप गर्दी जमली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले.
Kim Jong-un Sends New Year Cards
संबंधित बातम्या :
अमेरिकेत नोकरीचं स्वप्न बघणाऱ्यांना ट्रम्प यांचा झटका, H-1B visa सह इतर व्हिसांवरील बंदी वाढवली
मोठी बातमी: जागतिक आरोग्य संघटनेकडून आपातकालीन वापरासाठी फायझरच्या लशीला मंजुरी
अमेरिकी तज्ज्ञांचा दावा – जुलैपर्यंत कोरोना पूर्णपणे संपणार, पण….
चीनमध्ये ‘भरपेट’ खाणाऱ्यांना दणका, अतिखादाडांना 1 लाखांचा दंड, नवा कायदा लागू