7 ऑक्टोबरचा बदला पूर्ण झाला, गाझाचा ओसामा बिन लादेन ठार, इस्रायलची सैन्याने केले जाहीर

| Updated on: Aug 01, 2024 | 6:09 PM

इस्रायलने त्यांच्यावर गेल्यावर्षी ऐन दिवाळीत 7 ऑक्टोबरचा झालेल्या हल्ल्याचा बदला पूर्णपणे घेतला आहे. 24 तासात हमासचे तीन मोठे नेते इस्रायली सैन्याने नष्ट केले आहेत. हमासचा प्रमुख इस्माईल हनिये आणि हिजबुल्ला कमांडर फुआद शुक्र यांच्या खात्म्यानंतर सैन्य दल प्रमुख मोहम्मद देईफ याला देखील कंठस्नान घातल्याचे गुरुवारी इस्रायली सैन्याने जाहीर केले.

7 ऑक्टोबरचा बदला पूर्ण झाला, गाझाचा ओसामा बिन लादेन ठार, इस्रायलची सैन्याने केले जाहीर
hamas military chief mohmmed deif died
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

इस्रायली सैन्याने गेल्या 24 तासांत हमासला तीन मोठे धक्के दिले आहेत. हमासचा प्रमुख इस्माईल हनिये आणि हिजबुल्ला कमांडर फुआद शुक्र यांना ठार केल्यानंतर आता इस्रायली सैनिकांनी हमास अतिरेकी संघटनेने सैन्य प्रमुख मोहम्मद देईफ यांना देखील ठार केल्याचे म्हटले जात आहे. हमासचा सैन्य प्रमुख मोहम्मद देईफ खान युनिसमध्ये गेल्या महिन्यात केलेल्या हल्ल्यात ठार झाला होता असे गुरुवारी इस्रायली सैनिकांनी जाहीर केले आहे. याला ओसामा बिन लादेन ऑफ गाझा या नावाने ओळखले जात होते.

तेहरान येथे हमास प्रमुख इस्माईल हनिये यांच्या हत्येची घोषणा इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्स आणि हमासने केल्यानंतर एक दिवसाने इस्रायल सैन्याने देईफ याला मारल्याचे सांगितले आहे. मोहम्मद गेईफ या इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या नरसंहाराचा मास्टरमाईंड म्हटला जात आहे. गाजापट्टीतील खान युनिसमध्ये 13 जुलै रोजी एअर स्ट्राईक केला गेला होता. त्यातच मोहम्मद देईफचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात खान युनिस ब्रिगेडचा कमांडर राफा सलामेह आणि त्याचे अन्य लढावू साथीदार देखील ठार झाले आहे.

इस्रायल सैन्यदलाने केलेली पोस्ट येथे पाहा –

7 ऑक्टोबरचा बदला असा पूर्ण झाला

इस्रायली डिफेन्स फोर्स आणि इस्रायल सिक्युरिटी अथोरिटी यांच्या गुप्त माहिती आधारे गाझापट्टीत खान युनिस येथे संयुक्त कारवाई झाली.
इस्रायली सैन्याने खान युनिस परिसरात मोठा हल्ला केला होता. हमास सैन्याचा विंग कमांडर मोहम्मद देईफ येथे लपल्याची पक्की माहिती मिळाली होती. त्यानेच 7 ऑक्टोबर रोजीच्या इस्रायलवरील मोठ्या हवाई हल्ल्याची योजना आखली होती.

7 वेळा मारण्याचा प्रयत्न झाला होता

7 ऑक्टोबरच्या सकाळी जेव्हा हमासने इस्रायलवर हल्ला केला. तेव्हा अल जझीरा चॅलनने मोहम्मद देईफ याचा एक ऑडियो रिकॉर्डिंग संदेश प्रसारित केला होता. ज्यात हा इस्रायलच्या विरोधातील ‘अल-अक्सा फ्लड’ची सुरुआत आहे. देइफ याच्या मागावर इस्रायल तीन दशकांपासून होता. त्याला मारण्याचा सात वेळा प्रयत्न करण्यात आला होता. परंतू प्रत्येक वेळी तो वाचला अखेर 13 जुलैच्या सकाळी दक्षिण गाझात केलेल्या आठव्या हल्ल्यात त्याला ठार करण्यात यश आल्याने इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे.