लंडन: ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा (Coronavirus new strain) कहर वाढला असताना आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटीश सरकारकडून ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेन्का (Oxford/AstraZeneca) लशीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांसाठी मॉडर्ना पाठोपाठ आणखी एक लस उपलब्ध झाली आहे. लवकरच देशभरात या लशीचे वितरण आणि वापर सुरु होईल. ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेन्का लस कोरोनाचे निवारण करण्यात आणि संक्रमण रोखण्यात अत्यंत यशस्वी ठरल्याचे निष्कर्ष चाचण्यांदरम्यान समोर आले होते. (UK approves Oxford AstraZeneca’s coronavirus vaccine)
Authorisation recommends 2 doses administered with an interval of b/w 4 and 12 weeks. This regimen was shown in clinical trials to be safe & effective at preventing symptomatic COVID-19, with no severe cases & no hospitalisations more than 14 days after second dose: AstraZeneca https://t.co/k1IdgiE46J
— ANI (@ANI) December 30, 2020
ब्रिटनमधील औषध नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते 12 आठवड्यांच्या कालावधीत ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेन्का लशीचे दोन डोस देणे गरजेचे आहे. ब्रिटनमधील सध्याची परिस्थिती पाहता ही लस गेमचेंजर ठरू शकते. ब्रिटनने या लशीच्या 10 कोटी कुप्यांची ऑर्डर दिली होती. ब्रिटनमधील पाच कोटी लोकसंख्येसाठी हा साठा पुरेसा आहे.
ब्रिटनमधील समाजकल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार सरकारने MHRA विभागाची शिफारस मान्य करत लशीला मान्यता दिली. अनेक चाचण्या आणि तज्ज्ञांमध्ये झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. ही लस सर्व निकषांमध्ये उत्तीर्ण झाल्याचे समाजकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा जगभरात वेगाने फैलाव होत असल्यामुळे मोदी सरकारने ब्रिटनवरील (United Kingdom) हवाई निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटन आणि भारतातील हवाई सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका लक्षात घेता आता केंद्र सरकारने ब्रिटनवरील हवाई निर्बंधाचा कालवाधी 7 जानेवरीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली.
संबंधित बातम्या:
New Delhi | कोरोना स्ट्रेन विषाणूपासून बचावासाठी भारत-ब्रिटन विमानसेवा बंद
भारतात नव्या कोरोनाचे 20 रुग्ण, ब्रिटनहून पुण्यात आलेल्या 100 जणांचा पत्ता लागेना
एकही प्रवासी थेट घरी सोडणार नाही, सक्तीने क्वारंटाईन करणार, BMC आयुक्त अॅक्शन मोडमध्ये
(UK approves Oxford AstraZeneca’s coronavirus vaccine)