इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या करीमा बलोच यांचा मृतदेह कॅनडामध्ये सापडला. करीमा बलोच या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानत होत्या. कॅनडियन पत्रकार तारेक फतेह यांनी बलोच यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. (Pak Activist Karima Baloch who called Narendra Modi brother, found dead)
करीमा बलोच कॅनडात वास्तव्याला होत्या. गेल्या तीन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. कॅनडाच्या शरणार्थी असलेल्या बलोच यांचे नाव 2016 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. पाकिस्तानने केलेल्या अत्यचारांचा पाढा संयुक्त राष्ट्रासमोर मांडणाऱ्या अग्रणी महिलांपैकी त्या एक होत्या.
याआधी पत्रकार साजिद हुसैनही मे महिन्यात संशयास्पदरित्या मृतावस्थेत सापडले होते. पाकिस्तान करीमा बलोच यांना रॉचा एजंट मानत होता. बलुचिस्तान प्रांतात संसाधनांची कमतरता नाही, परंतु पाकिस्तानकडून रहिवाशांची मुस्कटदाबी होत असल्याचा दावा केला जातो. गेल्या 15 वर्षांपासून बलुचिस्तानात विद्रोह भडकला आहे. पाकिस्तानी सैन्याकडून क्रौर्याचा वापर करुन विनाकारण नागरिकांना तुरुंगात डांबल्याचा आरोप केला जातो. यापूर्वीही काही बलुची नेत्यांची हत्या झाली होती.
करीमा बलोच यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण भाऊ मानत असल्याचं म्हटलं होतं. बलुचिस्तानातील सर्वच महिलांच्या नजरा मोदींकडे लागून राहिल्या आहेत, असंही त्या म्हणाल्या होत्या. त्या बलुचिस्तानातील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा होत्या. मोदींना भाऊ संबोधून त्यांनी आंतरराष्ट्रीय फोरममध्ये मानवाधिकार उल्लंघनाविरोधात आवाज उठवण्यास सांगितलं होतं.
रक्षाबंधनला ट्विटरवर राखी शेअर करत करीमा बलोच यांनी मोदींकडे मागणी केली होती. बलुचिस्तानातील बेपत्ता बहीण-भावांचा शोध घ्या, पाकिस्तानाविरोधात मी जागतिक स्तरावर आवाज उचलणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला होता.
In 2016, #KarimaBaloch escaped the tyranny of the Pakistan Army and came to Canada as a refugee.
Today #Karima was drowned in Toronto by #Balochistan’s enemies to silence her, not knowing Karima’s speeches will live forever.
pic.twitter.com/pQ78umuO5f @ZaffarBaloch @PMOIndia pic.twitter.com/WGRS9lADhO— Tarek Fatah (@TarekFatah) December 22, 2020
(Pak Activist Karima Baloch who called Narendra Modi brother, found dead)