Pakistan: पाकिस्तानमध्ये दर दोन तासांत एक महिला ठरते बलात्काराची शिकार, धक्कादायक अहवाल समोर

| Updated on: Oct 13, 2022 | 10:36 PM

महिलांच्या बाबतीत करण्यात आलेला पाकिस्तानमधील एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. काय आहे या अहवालात?

Pakistan: पाकिस्तानमध्ये दर दोन तासांत एक महिला ठरते बलात्काराची शिकार, धक्कादायक अहवाल समोर
पाकिस्तानात बलात्काराचे प्रमाण
Image Credit source: Social Media
Follow us on

कराची, पाकिस्तानातील (Pakistan) महिलांचे जीवन नरकापेक्षा वेगळे नाही. एका अहवालात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. पाकिस्तानमध्ये दर दोन तासांनी एका महिलेवर बलात्कार (Rape on Women) होत असल्याचे सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, या गुन्ह्यात दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण (0.2 टक्के) देखील खूप कमी आहे. पाकिस्तानी चॅनल समा टीव्हीच्या सर्वेक्षणात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. सर्वेक्षणानुसार, 2017 ते 2021 या काळात देशात 21,900 महिलांवर बलात्कार झाल्याचे नवीन आकडेवारीवरून समोर आले आहे. याचा अर्थ पाकिस्तनामध्ये दररोज सुमारे 12 महिलांवर बलात्कार होतात.

काय आहे आकडेवारी

सर्वेक्षण अहवालानुसार 2017 मध्ये सुमारे 3327 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. 2018 मध्ये 4456 प्रकरणे नोंदवली गेली तर 2019 मध्ये 4573 प्रकरणे नोंदवली गेली. त्याच वेळी, 2020 मध्ये हा आकडा 4478 वर पोहोचला, तर 2021 मध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये 5169 पर्यंत वाढ झाली.

त्याच वेळी, या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये बलात्काराचे 305 गुन्हे दाखल झाले. या 305 गुन्ह्यांपैकी मे महिन्यात 57, जूनमध्ये 91, जुलैमध्ये 86 आणि ऑगस्टमध्ये 71 गुन्हे दाखल झाले आहेत. सर्व्हेअरच्या मते, वास्तविक प्रकरणे यापेक्षा जास्त असू शकतात, परंतु सामाजिक कलंक, भीतीमुळे महिला तक्रार दाखल करत नाहीत.

हे सुद्धा वाचा

 

दोषसिद्धीचा दर फक्त 0.2 टक्के

अहवालानुसार, 2022 मध्ये पाकिस्तानच्या 44 न्यायालयांमध्ये महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या 1301 प्रकरणांची सुनावणी झाली. पोलिसांनी 2856 प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. मात्र केवळ 4 टक्के प्रकरणांची सुनावणी झाली. या काळात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ 0.2 टक्के होते.

सन 2020 मध्ये, युनायटेड नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्रामने पाकिस्तानला 75 देशांमध्ये महिला विरोधी पक्षपात असलेल्या न्यायालयांमध्ये अग्रस्थानी ठेवले. त्याच वेळी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या वर्षी जुलैमध्ये जारी केलेल्या अहवालात लैंगिक समानतेच्या बाबतीत पाकिस्तानला दुसरा सर्वात वाईट देश म्हणून स्थान देण्यात आले आहे. 146 देशांच्या सर्वेक्षणात पाकिस्तान 145 व्या क्रमांकावर आहे.