नवी दिल्ली : भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर (Pakistan Fears Of Surgical Strike) पाकिस्तानच्या मनात आता पुन्हा एकदा धडकी भरली आहे. भारताकडून पुन्हा एकदा अशा प्रकारची कारवाई केली जाऊ शकते, अशी भीती पाकिस्तानला (Pakistan) आहे. एलओसी आणि पाक सीमेवर पुन्हा एकदा भारत कारवाई करु शकते, अशी शक्यता पाकला सतावते आहे. यामुळे पाकिस्तान इतका घाबरला आहे की त्यांनी आपल्या लष्कराला हाय अलर्टवर ठेवलं आहे. शेतकरी आंदोलनावरुन (Farmer Protest) लक्ष विचलित करण्यासाठी भारतस अशा प्रकारचं पाऊस उलचू शकतं, असा दावा पाकिस्तानने केला आहे (Pakistan Fears Of Surgical Strike).
पाकिस्तानच्या जियो न्यूजने लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. अंतर्गत आणि बाह्य दबाव दूर करण्यासाठी भारत खोटी सर्जिकल स्ट्राईक करु शकतो, असं जियो न्यूजने सांगितलं आहे. लडाख आणि डोकलाममध्ये आपला पराभव लपवण्यासाठी भारत असं करु शकतो. भारताने एलओसी आणि भारत-पाक सीमेवर हल्ला करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे हल्ल्याची शक्यता पाहता पाकिस्तानी लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे, असं पाक मीडियाने लिहिलं.
भारत खोटं ऑपरेशन राबवू शकतो जणेकरुन देशातील अंतर्गत समस्या म्हणेजेच अल्पसंख्यांकाप्रती गैरवर्तन, शेतकरी आंदोलन आणि काश्मीर मुद्यावरुन लक्ष विचलिच करता येईल. घाबरलेल्या पाकने हा देखील दावा केला आहे की, आंतरराष्ट्रीय मीडिया आणि संघटनांकडून टीका होत असताना भारत अस्वस्थ होत आहे (Pakistan Fears Of Surgical Strike).
भारताने आतापर्यंत अशा दोन सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला धडा शिकवला आहे. 2016 मध्ये भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडोने उरी येथील लष्करी कॅम्पवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेत पीओकेत सर्जिकल स्टाईक केली. येथील दहशतवादी तळ नष्ट करण्यात आलं. या हल्ल्यात दहशतवादी आणि पाकिस्तानचे सैनिक ठार झाले होते. तर गेल्या वर्षी पुलवामाचा बदला घेत भारताने बालाकोटवर एअर स्ट्राईक केली. यावेळी बालाकोटमधील दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते.
भारताविरोधात चीनच्या वाढत्या कुरापती, सीमेजवळ सैन्यतळ उभारणी सुरु#indiachina #IndiaChinaFaceOff #IndiaChinaBorderTension #Pakistan https://t.co/vvWvgjGWHr
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 9, 2020
Pakistan Fears Of Surgical Strike
संबंधित बातम्या :
जो बायडन यांचा ऐतिहासिक निर्णय, कृष्णवर्णीय व्यक्तीला पहिल्यांदा मिळणार संरक्षणमंत्रिपद?
नेपाळ-चीनने माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली ! उंची वाढली की कमी झाली?
पाकिस्तानातील गोंधळ वाढला, इमरान खान यांच्या विरोधात विरोधी पक्षांचे नेते सामूहिक राजीनामे देणार
भारताचा चीनला आणखी एक झटका, चीनकडून आयातीपेक्षा निर्यातीची टक्केवारी वाढली