नवी दिल्लीः पाकिस्तानात (Pakistan) पेट्रोलच्या (Petrol Price) दरांनी उच्चांक गाठला आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढणार हे निश्चित आहे. यातच पाकिस्तानात तूप किती रुपये किलो आहे, यावरून माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेला दावा सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरतोय. सध्या विरोधा बाकांवर असले तरी उचलली जीभ लावली टाळूला, अशा पद्धतीनं इम्रान खान यांनी आरोप केल्याचं म्हटलं जातंय. पाकिस्तानात ६०० अब्ज रुपये प्रतिकिलो या भावाने तूप विकलं जातंय, असं वक्तव्य एका भाषणादरम्यान इम्रान खान यांनी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सोशल मीडियावर लोकांनी या वक्तव्यावरून त्यांना धू धू धुतलंय.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एडिटेड कॉपी आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. व्हिडिओचं ड्युरेशन अत्यंत कमी असल्याने हे वक्तव्य नेमक्या कोणत्या संदर्भाने केलंय, ही माहिती कळू शकलेली नाही. मात्र या व्हिडिओत इम्रान खान म्हणातात, पाकिस्तानात आधी ३०० अब्ज रुपये प्रति किलो या भावाने तूप मिळत होते. ते आता ६०० अब्ज रुपपे प्रति किलो झाले आहे.
Buy 1 kg ghee in 600 billion rupees. ? pic.twitter.com/60gKujPMZ9
— Naila Inayat (@nailainayat) February 15, 2023
पाकिस्तानातील शहबाज शऱीफ यांच्या सरकारने बुधवारी पेट्रोलच्या किंमतीत २२.२० रुपयांची दरवाढ केली. तर हाय स्पीड डिझेलच्या दरांत १७.२० रुपयांची भाववाढ केली. या घोषणेनंतर पाकिस्तानमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे २७२ रुपये आणि २८० रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले आहेत.
जिओ न्यूजमधील रिपाकिस्तानच्या आर्थिक विभागाच्या वतीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचं कारण स्पष्ट करण्यात आलंय. पाकिस्तानाच्या रुपया या चलनात घसरण झाल्याचे हे परिणाम आहेत.पोर्टनुसार, सध्या पाकिस्तानात विदेश चलनाचं मोठं संकट आहे. त्यामुळे आयात आणि निर्यातीवर परिणाम झालाय. महागाई वाढली आहे.
IMF कडून पाकिस्तानला कर्ज मिळत नाहीये. संघटनेने पाकिस्तानसमोर कर्जासाठी कठोर अटी ठेवल्या आहेत. त्यात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ हीदेखील अट आहे.
पाकिस्तानमधील शाहबाज सरकारने मागील आठवड्यातच घोषणा केली. IMF बेलआउट पॅकेज अनलॉक करण्यासाठी चार महिन्यांत १७० बिलियन पाकिस्तानी रुपये जमा करण्यासाठी एक मिनी बजेट आणणार असल्याचं म्हटलं गेलं. १५ फेब्रुवारी रोजी एक बजेट सादर करण्यात आलं. त्यात अनेक प्रकारच्या करांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तान सध्या महागाई आणि उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे. याची शिक्षा आता तेथील सामान्य जनतेला मिळत आहे.