Pakistan PM Imran Khan Trust Vote इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्यावर मोठी नामुष्की आली. पाकिस्तानमधील सिनेट निवडणुकीत (Pakistan Senate Elections) ज्या अर्थमंत्री अब्दुल हाफिज शेख यांच्या प्रचारासाठी स्वतःइमरान खान फिरले, त्यांचाच या निवडणुकीत पराभव झाला. इमरान सरकारच्या अर्थमंत्र्याचाच पराभव झाल्याने पाकिस्तानमधील विरोध पक्षांनी इमरान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अखेर राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावत इमरान सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायला लावलं. सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्याने इमरान खान यांचं सरकार बहुमत मिळवू शकणार की नाही याची जोरदार चर्चा होती. मात्र, अखेर इमरान यांनी विश्वास मत जिंकलं आहे (Pakistan Imran Khan Government face trust vote in assembly).
पाकिस्तानमध्ये सर्वच विरोधी पक्ष इमरान सरकारविरोधात एकजूट झाले आहेत. 11 विरोधी पक्षांनी पाकिस्तान डॅमोक्रेटिक मूव्हमेंट (Pakistan Democratic Movement) नावाने महाआघाडी तयार केलीय. याच ताकदीवर पाकिस्तानमधील विरोधी पक्षांच्या पाकिस्तान डॅमोक्रेटिक मूव्हमेंटचे उमेदवार आणि माजी पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी (Yousaf Raza Gillani) यांनी सत्ताधारी पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे (Pakistan Tehreek-e-Insaf) उमेदवार अब्दुल हाफिज शेख (Abdul Hafeez Shaikh) यांचा निकटच्या लढाईत पराभव केला. यामुळे इमरान सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची नामुष्की आली.
इमरान सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्याने बहुमत चाचणी घेण्यात आली. यात मतविभाजन टाळण्यासाठी विरोधीपक्षांनी या बहुमत चाचणीवर बहिष्कार घातला. 342 सदस्यीय संसदेत इमरान सरकारला बहुमतासाठी 172 मतं आवश्यक होती. त्यामुळे त्यांचा जीव चांगलाच टांगणीला लागला होता. अखेर, बहुमत चाचणीत इमरान सरकारने 178 मतं मिळवत बहुमत सिद्ध केलं.
बहुमत सिद्ध करण्यासाठी इमरान खान यांच्याकडून जोरदार प्रयत्न
सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्याने इमरान खान यांना मोठा झटका लागला. त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी तात्काळी सत्ताधारी युतीच्या नेत्यांची बैठक बोलावली. तसेच सर्वांना सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी तयार केलं. यामुळेच इमरान सरकार बहुमत सिद्ध करु शकलं.
बहुमत सिद्ध केल्यानंतर इमरान खान काय म्हणाले?
बहुमत सिद्ध केल्यानंतर इमरान खान यांनी नॅशनल असेंब्लीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित नेत्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही अडचणी असता आणि त्या अडचणींचा सामना करता तेव्हा तुम्ही अधिक मजबूत होता (Imran Khan After Trust Vote). माझी सर्वात मोठी शक्ती बुद्धी आहे. मी माझ्या सर्व मंत्र्यांचे आभार मानतो. सरकारला मतं देणाऱ्या प्रत्येकाचे आभार.”
इमरान समर्थकांकडून पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मारहाण
पाकिस्तानच्या संसदेत बहुमत चाचणीसाठी मतदान होत असताना संसदेबाहेर मोठा गदारोळ पाहायला मिळाला. इमरान समर्थकांना अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ला केला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी (Shahid Khaqan Abbasi) यांना इमरान खान समर्थकांनी मारहाण केली. यानंतर अब्बासी समर्थकांनी त्यांना वाचवलं. तेव्हा हल्ला करणारे पळाले. पीएमएलएन नेता अहसान इकबाल (Ahsan Iqbal) यांच्यावरही चप्पल फेकण्यात आली.”
हेही वाचा :
Video : पाकिस्तानात इम्रान खान यांची अब्रू वाचली, पण समर्थकांची जोरदार राडेबाजी
पाकिस्तानची बर्बादीकडे वाटचाल तर बांग्लादेशची श्रीमंतीकडे, असं का घडतंय? वाचा सविस्तर
प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानचा काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट
व्हिडीओ पाहा :
Pakistan Imran Khan Government face trust vote in assembly